Shoaib Bashir Received His Indian Visa : इंग्लंडचा युवा फिरकीपटू शोएब बशिरला अखेर भारताचा व्हिसा मिळाला असून त्याचा कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आठवड्याच्या शेवटीपर्यंत शोएब बशिर हा भारतात दाखल होईल. याबाबतची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डानेच दिली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले की, 'आम्हाला आनंद आहे की आता ही समस्या सोडवली गेली आहे.' इंग्लंड क्रिकेट बोर्डाने डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यासाठीचा आपला कसोटी संघ जाहीर केला होता. इंग्लंड संघ भारतात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे त्यांना व्हिसासाठी पुरेसा वेळ मिळाला होता.
मात्र बशिरचे वंशज पाकिस्तानी असल्याने त्याला सुरूवातीला व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यामुळे तो हैदराबाद येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतात दाखल होऊ शकला नव्हता.
शोएब बशिर आता इंग्लंडच्या संघाशी जोडला जाईल. तो विशाखापट्टणम येथील कसोटीत इंग्लंडकडून पदार्पण करण्याची शक्यता आहे. भारताचा व्हिसा मिळण्यास विलंब झाल्याने बशिर हा हैदराबाद कसोटीपूर्वी चर्चात आला आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने हे सर्व प्रकरण निराशाजनक असल्याचे म्हटले होते. ब्रिटीश सरकारचे प्रवक्ते यांनी युवा क्रिकेटपटूला योग्य वागणूक द्या अशी मागणी केली होती.
20 वर्षाचा बशिर हा पाकिस्तानी मूळ असलेला क्रिकेटपटू आहे. तो काऊन्टी क्रिकेटमध्ये सोमेरसेट कडून खेळतो. भारताचा व्हिसा नाकारल्यानंतर त्याला अबू धाबीतून मायदेशात परतावे लागले होते. अबू धाबीत तो सराव करत होता.
स्टोक्सने पत्रकार परिषदेत सांगितले की, 'ज्यावेळी मला अबू धाबीत ही बातमी मिळाली त्यावेळी मी सांगितले होते की आम्ही बॅशला व्हिसा मिळाल्याशिवाय येणार नाही. मी ते विनोदानं म्हणालो होते. मात्र मला माहिती होतं की त्याच्यापेक्षाही मोठं आहे. माझं त्यावेळेचं वक्तव्य हे भावनिकदृष्ट्या केलेलं वक्तव्य होतं. मात्र बशिरला ज्या गोष्टीतून जावं लागले ते निराशाजनक आहे.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.