India vs England Test Series : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 106 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. दरम्यान, दोन्ही संघांच्या खेळाडूंना 10 दिवसांचा ब्रेक मिळाला आहे.
दुसरा कसोटी सामना एक दिवस आधी संपला. अशा परिस्थितीत, बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अबुधाबीला जाणार आहे, जिथे मालिकेच्या तयारीसाठी सराव शिबिर लावणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लिश खेळाडू भारतात परततील.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) दुस-या आणि तिसऱ्या कसोटी दरम्यानच्या 10 दिवसांच्या विश्रांतीचा उपयोग करण्यासाठी आपल्या खेळाडूंचे हित लक्षात घेऊन अबू धाबीला जाण्याची योजना आखली आहे. या महत्त्वाच्या विश्रांतीदरम्यान इंग्लंडचा संघ गोल्फही खेळणार आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, इंग्लंडचे अनेक खेळाडू आजारी पडले आहेत. अशा परिस्थितीत ताजेतवाने करण्यासाठी इंग्लंड बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
याआधी सराव सामन्यांसाठी भारतात लवकर पोहोचण्याऐवजी अबुधाबीमध्ये सराव शिबिर घेऊन इंग्लंडने या कसोटी मालिकेची तयारी केली होती. मालिकेपूर्वी अबुधाबी कॅम्प दरम्यान, इंग्लंड संघाने भारतीय फिरकीपटूंना खेळण्यासाठी बराच वेळ घालवला होता.
यानंतर इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकला, मात्र दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या रिव्हर्स स्विंग गोलंदाजीपुढे त्यांचे फलंदाज गारद झाले. आता पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.