Ben Stokes Retirement ODI Cricket : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टीम इंडियाविरुद्धची मालिका हरल्यानंतर बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला रामराम घेतला आहे. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असून तो टी-20 आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे.(England Test Captain Ben Stokes Retirement From ODI Cricket sports cricket)
बेन स्टोक्स प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात म्हणतो की, 'मी इंग्लंडकडून वनडे क्रिकेटमधील माझा शेवटचा सामना मंगळवारी डरहॅममध्ये खेळणार आहे. मी वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.' बेन स्टोक्सने एप्रिल महिन्यात इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. बेन स्टोक्स 2019 मध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलचा सामनावीर होता. इंग्लंडने लॉर्ड्सवर न्यूझीलंडचा पराभव करत इतिहासात पहिल्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले होते.
दरम्यान, बेन स्टोक्स निवृत्तीबाबत म्हणाला की, तीनही क्रिकेट प्रकारात खेळणे माझ्यासाठी आता शक्य नाही. तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी माझे शरीर आता साथ देत नाहीये. व्यग्र वेळापत्रकामुळे खूप दमछाक होते. तसेच मला असे वाटते की मी एका दुसऱ्या खेळाडूची जागा देखील घेत आहे. तो खेळाडू जॉस बटलर आणि संघासाठी आपले 100 टक्के देऊ शकतो.'
दरम्यान, वेन स्टोक्सच्या डोक्यात कसोटी क्रिकेटवर फोकस करण्याचा विचार हा आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या सुरूवातीपासूनच घोळत होता. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर आल्यानंतर आयपीएलमधून माघार घेतली होती. आता स्टोक्स फक्त कसोटी खेळणार की टी 20 देखील खेळणार याबाबत संभ्रम आहे. तसेच तो आयपीएलसाठी देखील उपलब्ध असणार की नाही हे गुलदस्त्यातच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.