Joe Root Twitter
क्रीडा

IND vs ENG Test Day 2 : अखेरचं सत्र भारताचं, पण रुट खेळतोय मस्त

पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ज्यो रुटने पुन्हा एकदा कर्णधाराला साजेसा खेळ करताना दिसला.

सुशांत जाधव

England vs India, 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसातील तिसरे सत्र भारतीय संघाच्या गोलंदाजांनी गाजवले. 31 षटकात 96 धावा खर्च करत भारताने तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाचा डाव 364 धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावाला सुरुवात केली. रॉरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ले या जोडीने इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. इंग्लंडच्या धावफलकावर अवघ्या 23 धावा असताना सिराजने सिब्लेच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले.

त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या हसीब हमीदला सिराजने आल्या पावली चालते करत यजमानांना अडचणीत आणले. पण त्यानंतर कर्णधार ज्यो रुटने रॉरी बर्न्सच्या साथीनं संघाचा डाव सावरला. ही जोडी सेट झाल्यानंतर दुसरा दिवस इंग्लंडच्या नावे होणार असे वाटत होते. मात्र धावफलकावर 108 धावा असताना शमीने इनस्विंगवर रॉरी बर्न्सला पायचित करत भारताला तिसरे यश मिळवून देत तिसरे सेशन भारताच्या बाजूनं वळवले.

रॉरी बर्न्स 136 चेंडूत 49 धावा करुन बाद झाला. पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ज्यो रुटने पुन्हा एकदा कर्णधाराला साजेसा खेळ करताना दिसला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रुट 75 चेंडूचा सामना करुन 48 धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला जॉनी बेयरस्ट्रो 17 चेंडूत 6 धावांवर नाबाद होता. इंग्लंडने 45 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 119 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ अजूनही 245 धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या दिवशी ज्यो रुटला लवकरात लवकर बाद करुन सामन्यावर मजबूत पकड मिळवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

Adani Group: अमेरिकेनंतर आता बांगलादेश देणार अदानींना झटका; करोडोंच्या डीलची होणार चौकशी, काय आहे प्रकरण?

Karad Election: पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील कसे झाले पराभूत? आघाडीत बिघाडीचा दोघांनाही बसला फटका, जाणून घ्या सविस्तर

Viral Video : नवरा बनला सुपरमॅन; चोराला पकडण्यासाठी फिल्मी स्टाईलने टॅम्पोला लटकला!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT