England vs India 3rd ODI Live 
क्रीडा

Eng vs Ind 3rd ODI: भारताने T20 पाठोपाठ ODI ही इंग्लंडला दिली मात

भारताला मालिका जिंकण्यासाठी 260 धावांचे लक्ष्य

Kiran Mahanavar

England vs India 3rd ODI Live : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज मँचेस्टरच्या मैदानावर खेळला गेला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडचा 5 विकेट राखून पराभव केला. विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली.

टीम इंडियासमोर इंग्लंडची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरत आहे. झटपट धावा काढण्याच्या नादात इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. भारताने मालिकेत इंग्लंडला सलग तिसऱ्यांदा ऑलआऊट केले. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 60 धावा केल्या. बटलरशिवाय जेसन रॉयने 41, मोईन अलीने 34, क्रेग ओव्हरटनने 32 आणि बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 27-27 धावांचे योगदान दिले. भारताकडून हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत 7 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. हार्दिकच्या वनडे कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्यांच्याशिवाय युझवेंद्र चहलने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.

प्रत्युत्तरात भारताने 42.1 षटकांत 5 बाद 261 धावा करून सामना जिंकला. शिखर धवन एक धाव काढून बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा 17 धावा करून झेलबाद झाला. विराट कोहलीला केवळ 17 धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने 16 धावा केल्या. हार्दिक पांड्या 55 चेंडूत 71 धावा काढून बाद झाला. हार्दिकने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. त्याने ऋषभ पंतसोबत पाचव्या विकेटसाठी 115 चेंडूत 133 धावांची भागीदारी केली आणि भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.

भारताला पाचवा धक्का, पंड्या शानदार खेळी करून आऊट

भारताला 36व्या षटकात 205 धावांवर पाचवा धक्का बसला. हार्दिक पांड्या 55 चेंडूत 71 धावा काढून बाद झाला. हार्दिकने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. त्याने ऋषभ पंतसोबत पाचव्या विकेटसाठी 115 चेंडूत 133 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाला आता 84 चेंडूत 54 धावांची गरज आहे. सध्या पंत 88 चेंडूत 77 आणि रवींद्र जडेजाने एक धावा करून क्रीजवर आहे.

ऋषभ पंतनेही अर्धशतक

ऋषभ पंतनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. पंतने 71 चेंडूंचा सामना करत पाच चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. 31 षटक संपल्यानंतर भारताची धावसंख्या 4 बाद 159 अशी आहे. हार्दिक पांड्या 52 आणि ऋषभ पंत 50 धावा करत खेळत आहे.

हार्दिक पंड्याचे अर्धशतक

हार्दिक पंड्याने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. यादरम्यान हार्दिकने सात चौकार मारले आहेत. हार्दिक पांड्या 51 आणि ऋषभ पंत 45 धावा करत खेळत आहे. आता भारताला सामना जिंकण्यासाठी 107 धावांची गरज आहे.

पांड्या आणि पंत यांच्यात पन्नास धावांची भागीदारी

25 षटकांनंतर भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 125 धावा केल्या. सध्या हार्दिक पांड्या 28 चेंडूत 35 आणि ऋषभ पंत 52 चेंडूत 35 धावा करत फलंदाजी करत आहे. टीम इंडियाला आता 25 षटकात 135 धावांची गरज आहे. पंड्या आणि पंत यांच्यात पाचव्या विकेटसाठी 50 हून अधिक धावांची भागीदारी झाली.

भारताची चौथी विकेट पडली

भारतीय संघाला चौथा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. क्रेग ओव्हरटनने सूर्याला झेलबाद केले. 16.2 षटकांनंतर भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 72 धावा आहे.

विराट कोहली 17 धावांवर आऊट 

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीही या सामन्यात पण फार काही करू शकला नाही. 22 चेंडूत 17 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. आता जवळपास महिनाभराच्या ब्रेकनंतर चाहत्यांना आता तो अॅक्शन करताना दिसणार आहे. रीस टोपलीने त्याला झेलबाद केले. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर कोहली पुन्हा एकदा बाद झाला.

टोपलीने भारताला दिला दुसरा धक्का; धवननंतर रोहितही आऊट

भारतीय संघ बॅकफूटवर शिखर धवननंतर कर्णधार रोहित शर्माही आऊट झाला आहे. रोहितने 17 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या. आता ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.

भारताची पहिली विकेट पडली; शिखर धवनला रीस टोपलीने केले बाद

रीस टोपलेने टीम इंडियाला पहिला धक्का दिला आहे. शिखर धवनने टोपलीच्या चेंडूवर झेलबाद झाला. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आहे.

भारताच्या डावाला सुरुवात, क्रिझवर रोहित-धवनची सलामी जोडी

निर्णायक एकदिवसीय सामन्यात इंग्लंडकडून 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन ही सलामीची जोडी क्रीझवर उतरली आहे.

हार्दिकची सर्वोत्तम गोलंदाजी, भारताला मालिका जिंकण्यासाठी 260 धावांचे लक्ष्य

इंग्लंडने 45.5 षटकांत सर्व विकेट्स गमावून 259 धावा केल्या. भारताला आता मालिका जिंकण्यासाठी 260 धावा करायच्या आहेत. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 60 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने 4 विकेट घेतल्या.

युझवेंद्र चहलने इंग्लंडला दिला 9 वा धक्का

युझवेंद्र चहलने एकाच षटकात 2 विकेट घेतल्याने इंग्लंडचा डाव 259 धावांवर संपला.

इंग्लंडची आठवी विकेट पडली, डेव्हिड विली 18 धावांवर बाद

इंग्लंडने 44 षटकांत 249 धावांत 8 विकेट गमावल्या आहेत. डेव्हिड विली 18 धावा करून बाद झाला.

इंग्लंडला सहावा धक्का, 27 धावा करून लियाम लिव्हिंगस्टोन पंड्याचा तिसरा बळी

हार्दिक पांड्याने एकाच षटकात लियाम लिव्हिंगस्टोन आणि कर्णधार जोस बटलरला बाद करत इंग्लंडच्या सात विकेट्स 199 पर्यंत केल्या आहेत. लिव्हिंगस्टोनने 27 तर बटलरने 60 धावा केल्या. या सामन्यातील हार्दिकची ही चौथी विकेट आहे, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी आहे.

जोस बटलरची कप्तानी पारी

इंग्लंडने 32 षटकांनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावा केल्या. सध्या कर्णधार जोस बटलर 51 आणि लियाम लिव्हिंगस्टोन 9 धावा करत आहे. बटलरने वनडे कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक झळकावले. त्याने 65 चेंडूत ही खेळी केली.

इंग्लंडला पाचवा धक्का, मोईन अली आऊट

इंग्लंडला 28व्या षटकात 149 धावांवर पाचवा धक्का बसला. रवींद्र जडेजाने मोईन अलीला ऋषभ पंतकडे झेलबाद केले. मोईन 44 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला. मोईन आणि जोस बटलर यांनी 84 चेंडूत 75 धावांची भागीदारी केली. 28 षटकांनंतर इंग्लंडने 5 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावा केल्या.

इंग्लंड 4 षटकांत 131/4

25 षटकांनंतर इंग्लंडने 4 गड्यांच्या मोबदल्यात 131 धावा केल्या आहे. सध्या मोईन अली 35 चेंडूत 24 आणि जोस बटलर 49 चेंडूत 32 धावा करून खेळत आहेत. दोघांमध्ये 50 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.

मोहम्मद सिराज अन् हार्दिक पांड्या कहर तिसऱ्या वनडेत इंग्लंड बॅकफूटवर

टीम इंडियासमोर इंग्लंडची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरत आहे. झटपट धावा काढण्याच्या नादात इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. प्रथम जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांना खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी जेसन रॉय 41 आणि बेन स्टोक्स 27 धावा करून आउट झाले.

पांड्याची घातक गोलंदाजी, स्टोक्सला बाद करत इंग्लंडला दिला चौथा धक्का

हार्दिक पांड्या गोलंदाजी कहर करत आहे. त्याच्या तिसऱ्या षटकात त्याने दुसरी विकेट घेतली. रॉयनंतर त्याने स्टोक्सला 27 च्या स्कोअरवर बाद करून भारताला चौथे यश मिळवून दिले. इंग्लंडने 74 धावांवर चौथी विकेट गमावली.

इंग्लंडला तिसरा धक्का, जेसन रॉय 41 धावांवर बाद

इंग्लंडला 10व्या षटकात 66 धावांवर तिसरा धक्का बसला. हार्दिक पंड्याने जेसन रॉयला ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. रॉयचे अर्धशतक हुकले आणि तो 31 चेंडूत 41 धावा करून बाद झाला.

इंग्लंड 50 पार

मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकात जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांना शून्यावर बाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली, रॉय आणि स्टोक्सने इंग्लंडचा धावगती कमी होऊ दिला नाही. इंग्लंडने 8व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या आहेत.

मोहम्मद सिराजची घातक गोलंदाजी; इंग्लंडला दिला दुसरा धक्का

सिराजने आपल्या पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले. तिसऱ्या चेंडूवर त्याने जॉनी बेअरस्टोला बाद केले आणि शेवटच्या चेंडूवर त्याने जो रूटला स्लिपमध्ये झेलबाद केले. इंग्लंडचे दोन्ही खेळाडू खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले.

मोहम्मद सिराजने इंग्लंडला दिला पहिला धक्का

दुसऱ्या षटकातच मोहम्मद सिराजने भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. जॉनी बेअरस्टोला झेलबाद करून सिराजने इंग्लंडला पहिला धक्का दिला. बेअरस्टो खाते न उघडताच बाद झाला. सलामीवीर जेसन रॉयने पहिल्याच षटकात तीन चौकार मारले.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 1 षटकात एकही विकेट न गमावता 12 धावा केल्या.

जसप्रीत बुमराह बाहेर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात 6 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे.

इंग्लंड : जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स, रीस टोपली.

भारत - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रणंद कृष्णा.

भारताने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

विराटकडे अखेरची संधी?

विराट कोहलीची तिसरा सामना महत्त्वाचा असेल कारण नंतर होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो जाणार नाहीये. क्रिकेटमधील नशिबाचे दरवाजे त्याच्याकरिता कधी उघडतात याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT