Sri Lanka Defeats England  Esakal
क्रीडा

ENG vs SL : बंगळूरच्या छोट्याशा स्टेडियमवर सुद्धा इंग्रजांची पळताभुई! लंकेसमोर गतविजेते १५६ धावांवर कोलमडले

Kiran Mahanavar

England vs Sri Lanka World Cup 2023 :

विश्वविजेत्या इंग्लंड संघाची वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात खराब झाली होती. पण पाच सामन्यानंतर संघ चांगली टक्कर देऊ शकेल असे वाटत नाही. कारण त्यांची स्फोटक फलंदाजी लाजीरवाणी कामगिरी करत आहे. बंगळूरच्या छोट्याशा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध करो या मरोच्या सामन्यात जोस बटलरचा संघ अवघ्या 156 धावांत कोलमडला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने चांगली सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान या जोडीने वेगवान सुरुवात करून पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. मालन 28 धावा करून अँजेलो मॅथ्यूजचा बळी ठरला.

यानंतर विकेट्सची रांग लागली. जो रूट तीन धावा करून धावबाद झाला. तर कसून राजिताने बेअरस्टोला 30 धावांवर बाद केले. कर्णधार बटलर आठ धावा करून तर लिव्हिंगस्टोन एक धावा करून बाद झाला. 85 धावांत पाच गडी गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ संघर्ष करत होता.

मात्र, बेन स्टोक्स एका टोकाला उभा होता. अशा स्थितीत इंग्लिश फलंदाजांकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. इंग्लंडचे फलंदाज खराब शॉट खेळून विकेट्स देत राहिले. मोईन अली 15, ख्रिस वोक्स 0 आणि आदिल रशीद 2 धावा करून बाद झाले.

दरम्यान, बेन स्टोक्सही वैयक्तिक 43 धावांवर बाद झाला. रशीदने निष्काळजीपणामुळे विकेट गमावली. शेवटी मार्क वुडही पाच धावा करून बाद झाला. विली 14 धावा करून नाबाद राहिला. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने तीन बळी घेतले. अँजेलो मॅथ्यूज आणि कसून रजिताने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तिक्ष्णाने एक विकेट घेतली.

आजचा सामना हरणारा संघ 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधून बाहेर पडू शकतो. दोन्ही संघांनी आतापर्यंत 4-4 सामने खेळले असून त्यापैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. वर्ल्ड कपच्या 2023 पॉइंट टेबलमध्ये श्रीलंका संघ चांगल्या रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू ते तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे निकष? सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

SCROLL FOR NEXT