Shafali Verma  Twitter
क्रीडा

शफाली नर्व्हस नाइंटीची शिकार; 4 धावांनी शतक हुकले!

महिला क्रिकेटमध्ये एका डावात दोन षटकार खेचणाऱ्या मोजक्या महिला फलंदाजांमध्येही तिने स्थान मिळवले आहे.

सुशांत जाधव

England Women vs India Women Test : इंग्लंड विरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शफाली वर्माने अनेक विक्रम आपल्या नावे केले. पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करणारी शफाली भारतीय महिला संघाची पहिली फलंदाज ठरली. कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी भारतीय महिला क्रिकेटर चंद्रकांत कौल यांनी न्यूझीलंड विरुद्ध 75 धावांची खेळी केली होती. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 1995 मधील ही खेळी भारतीय कसोटीतील सर्वाच्च खेळी होती. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात शफालीने हा विक्रम मागे टाकला. याशिवाय पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करण्याचा पराक्रम करुन दाखवला. शफालीने 152 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 96 धावांची खेळी केली. महिला क्रिकेटमध्ये एका डावात दोन षटकार खेचणाऱ्या मोजक्या महिला फलंदाजांमध्येही तिने स्थान मिळवले आहे. (England Women vs India Women Test Shafali Verma misses century just 4 runs after Set New Record)

ऑस्ट्रेलियाची एलिसा जीन हिली हिने 2017 मध्ये एका डावात 2 षटकार लगावले होते. इंग्लंडची सलामीची फलंदाज लॉरेन विनफिल्ड-हिल हिने भारतीय महिलांविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात 2 षटकार मारले होते. या दोघींनंतर एका डावात दोन षटकार खेचणारी शफाली तिसरी खेळाडू ठरली.

श्रीबसोल बी केट क्रॉस हिच्या गोलंदाजीवर शफाली शतकाला चार धावा कमी असताना कॅच आउट झाली. स्मृती मानधनाच्या साथीने तिने पहिल्या विकेटसाठी 48.5 षटकात 167 धावांची भागीदारी रचली. इंग्लिश क्रिकेटर शार्लोट एडवर्ड्स यांनी वयाच्या 17 व्या वर्षी ( 16 वर्षे 209 दिवस ) कसोटी पदार्पण केले होते. सर्वात कमी वयात कसोटी खेळण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. त्यानंतर शफालीचा नंबर लागतो.

शफालीने 17 वर्षे 140 वयात कसोटीत पदार्पण केले. पहिल्या वहिल्या सामन्यात शतकी धमाका करण्याची तिला संधी होती. पण अवघ्या 4 धावांनी ती हुकली. स्मृती मानधनाने 18 वर्षे 26 दिवस वयात पहिला कसोटी सामना खेळला होता. श्रीलंकेची क्रिकेटर चामणी सेनेविरत्ने हिने 19 वर्षे 156 वयात कसोटीत शतक झळकवण्याचा पराक्रम केला होता. पाकिस्तान विरुद्ध तिने 105 धावांची नाबाद खेळी केली होती. 1998 मध्ये नोंदवलेला हा विक्रम मोडण्याची संधी शफालीकडे होती. पण दुर्देवाने ती बाद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंझ! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेंचा पराभव निश्चित, चौदाव्या फेरी अंती तिसऱ्या स्थानी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

SCROLL FOR NEXT