Euro 2020 twitter
क्रीडा

डेन्मार्कची क्वालिफाय कॉलिटी!

सलामीच्या सामन्यात आपला आक्रमक मिडफिल्डर मैदानात कोसळल्यानंतर संघ मनानं खचला. त्याच्या सांगण्यावरुनच टीम काही वेळातच मैदानात उतरली.

सुशांत जाधव

युरो कप स्पर्धेत दुबळ्या वाटणाऱ्या डेन्मार्कने रशियाचा 4-1 असा धुव्वा उडवत दिमाखात नॉक आउट राउंडमध्ये प्रवेश केला. ग्रुप बी मध्ये असलेल्या डेन्मार्कला पहिल्या सामन्यात मोठा धक्का बसला होता. 10 नंबर जर्सीतील त्यांचा महत्त्वाचा खेळाडू क्रिस्तियान एरिक्सन चालु सामन्यात मैदानात कोसळला. या सामन्यात त्यांना फिनलंडकडून पराभवाचा सामनाही करावा लागला. पण त्यानंतर दिमाखदार खेळ करत ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर राहुन त्यांनी अखेरच्या 16 टीममध्ये स्थान मिळवले आहे. डेन्मार्कचा संघ मागील युरो चषकासाठी पात्र ठरला नव्हता. त्याच्यापूर्वी त्यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. पण यंदाच्या हंगामात त्यांनी अखेरच्या 16 मध्ये स्थान पक्के केले. (euro-2020-point-table Denmark register memorable 4-1 win against Russia to qualify for R16)

सलामीच्या सामन्यात आपला आक्रमक मिडफिल्डर मैदानात कोसळल्यानंतर संघ मनानं खचला. त्याच्या सांगण्यावरुनच टीम काही वेळातच मैदानात उतरली. यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण यातून सावरत त्यांनी स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. ग्रुप बीमधून बेल्जियम आणि डेन्मार्क हे दोन संघ नॉक आउट राउंडमध्ये पोहचले आहेत. ग्रुप सी मध्ये नॅदरलंड आणि ऑस्ट्रियाने प्रत्येकी 9 आणि 6 गुण मिळवत स्पर्धेतील आपला प्रवास कायम ठेवलाय. यापूर्वी इटली आणि वेल्स या संघांनी राउंड 16 तील स्थान पक्के केले होते.

डी ग्रुपमध्ये आता चेक प्रजासत्ताक आणि इंग्लंड 4-4 गुणांसह पहिल्या दुसऱ्या स्थानावर आहेत. यांचे बाद फेरितील स्थान जवळपास निश्चित आहे. ग्रुप ईमध्ये स्वीडन सेफमध्ये असून स्लोविकिया, स्पेन आणि पोलंड यांच्यात प्ले ऑफची शर्यत असेल. डेथ ग्रुपमध्ये फ्रान्स आघाडीवर असून जर्मनी आणि पोर्तुगाल यांच्यात फाईट पाहायला मिळेल. हे दोन्ही संघ 16 मध्ये दिसू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT