England vs Germany  Twitter
क्रीडा

जर्मनीचा खेळ खल्लास; स्टर्लिंग-हॅरीच्या जोरावर इंग्लंडची हवा!

सर्वाधिक वेळा युरो चॅम्पियनचा विक्रम नावे असलेल्या जर्मनीला बॅकफूटवर ढकलले.

सुशांत जाधव

EURO 2020 : इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या हाफमध्ये आक्रमक खेळ करत सर्वाधिक वेळा युरो चॅम्पियनचा विक्रम नावे असलेल्या जर्मनीला बॅकफूटवर ढकलले. रहिम स्टर्लिंगने 75 व्या मिनिटाला संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कर्णधार हॅरी केनने 86 व्या मिनिटाला दुसरा गोल डागून ही आघाडी मजबूत केली. हॅरी केनचा युरोतील हा पहिला गोल आहे. मोक्याच्या क्षणी त्याने संघासाठी मोलाचे योगदान दिले. पोर्तुगाल, फ्रान्स पाठोपाठ जर्मनीच्या संघासोबत डेथ ग्रुपमधून नॉक आउटमध्ये क्वालिफाय झालेल्या सर्व संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आलाय. (EURO 2020 Round of 16 England vs Germany Raheem Sterling and Harry Kane Goal England Win 2-0 And Enter Quarter Final)

पोर्तुगाल, फ्रान्स पाठोपाठ जर्मनीच्या संघासोबत डेथ ग्रुपमधून नॉक आउटमध्ये क्वालिफाय झालेल्या सर्व संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आलाय. या सामन्यातील विजयासह इंग्लंडने 25 वर्षानंतर नॉक आउटमध्ये यश मिळवले आहे. दुसरीकडे जर्मनीच्या संघावर बाद फेरीत पोहचल्यानंतर पहिल्यांदाच सेमीफायनलपूर्वी पराभवाची नामुष्की ओढावलीये.

युरो कप स्पर्धेतील इंग्लंड आणि जर्मनी यांच्यातील रेकॉर्ड हे जर्मनीच्या बाजूने होते. सर्वाधिक वेळा फायनलमध्ये पोहचून तब्बल तीन वेळा या स्पर्धेतील जेतेपद मिळवलेल्या जर्मनीने इंग्लंडला 15 वेळा पराभूत केले होते. इंग्लंडने जर्मनी विरुद्ध 13 सामन्यात विजय नोंदवला होता. दोन्ही संघात आतापर्यंत 4 सामने अनिर्णित राहिले होते. या सामन्यातील विजयासह जर्मनीने क्वार्टर फायनलचे तिकीट मिळवलेच याशिवाय जर्मनीविरुद्धच्या खराब रेकॉर्डमध्ये सुधारणाही केली. आता जर्मनीने इंग्लंडपेक्षा केवळ एक सामना अधिक जिंकला आहे. युरोच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहचणारी इंग्लंड ही सातवी टीम आहे. स्वीडन आणि युक्रेन यांच्यातील लढतीनंतर युरोच्या क्वार्टरफायनलमधील आठवी टीम आपल्या समोर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT