Euro 2024 sakal
क्रीडा

Euro 2024 : सुपर सब कॉन्सेसावमुळे पोर्तुगालची बाजी; चेक प्रजासत्ताकाविरुद्ध भरपाई वेळेत गोल निर्णायक

लुकास प्रोवोद याने ६२ व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे चेक प्रजासत्ताकाचा संघ आघाडीवर गेला.

सकाळ वृत्तसेवा

लायपझिग (जर्मनी) : पोर्तुगालचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी सामन्याच्या नव्वदाव्या मिनिटास केलेले बदल निर्णायक ठरले. फ्रान्सिस्को कॉन्सेसाव याच्या भरपाई वेळेमधील संधीसाधू गोलमुळे माजी विजेत्यांनी चेक प्रजासत्ताकाची (चेकिया) झुंज २-१ अशी मोडून युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या फ गटात पूर्ण गुणांची कमाई केली.

लुकास प्रोवोद याने ६२ व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे चेक प्रजासत्ताकाचा संघ आघाडीवर गेला. नंतर ६९ व्या मिनिटास रॉबिन ह्रॅनॅक याच्या स्वयंगोलमुळे पोर्तुगालला बरोबरी साधता आली.

यावेळी नुनो मेंडिसचे हेडिंग गोलरक्षक जिंद्रिक स्टॅनेक याने रोखले होते, पण ह्रॅनॅकमुळे चेंडू गोलनेटमध्ये गेला. बदली खेळाडू फ्रान्सिस्को कॉन्सेसाव व पेद्रो नेटो यांच्या दमदार खेळामुळे ९०+२ व्या मिनिटास पोर्तुगालने २-१ अशा आघाडीसह सामना जिंकला. त्यापूर्वी, पोर्तुगालच्या दियोगो जोता याचा गोल ऑफसाईड ठरला होता.

सामना बरोबरीकडे झुकत असताना प्रशिक्षक मार्टिनेझ यांनी निर्धारित वेळेतील अखेरच्या मिनिटास संघ तीन बदल केले. व्हितिन्हाच्या जागी कॉन्सेसाव, जुवाव कान्सेलोच्या जागी नेल्सन सिमेदो, तर नुनो मेंडिस याच्या जागी पेद्रो नेटो यांना संधी दिली.

भरपाई वेळेच्या दुसऱ्या मिनिटास पोर्तुगालच्या नेटो याचा फटका चेक प्रजासत्ताकाचा बचावपटू रॉबिन ह्रॅनॅक व्यवस्थित रोखू शकला नाही आणि चेंडू कॉन्सेसावच्या ताब्यात गेला. यावेळी पोर्तुगीज विंगरने सणसणीत फटक्यावर संघाला आघाडी मिळवून दिली. गोलनंतर कॉन्सेसावने जर्सी काढून जल्लोष केला, त्यामुळे त्याला यलो कार्डलाही सामोरे जावे लागले.

गटातील पुढील लढतीत २२ जून रोजी तुर्किए व पोर्तुगाल यांच्यात, तर जॉर्जिया व चेक प्रजासत्ताक यांच्यात लढत होईल. या गटातील अगोदरच्या लढतीत तुर्किएने जॉर्जियाला ३-१ असे हरविले.

असाही योगायोग

पोर्तुगालचा बदली खेळाडू २१ वर्षीय फ्रान्सिस्को कॉन्सेसाव याचे वडील सर्जिओ कॉन्सेसाव याने २४ वर्षांपूर्वी २००० मधील युरो करंडक स्पर्धेत पोर्तुगालच्या विजयात हॅट्ट्रिक साधली होती, त्यामुळे तेव्हाच्या गतविजेत्या जर्मनीचे आव्हान संपुष्टात आले होते. मंगळवारी रात्री फ्रान्सिस्कोने चेक प्रजासत्ताकाचे स्वप्न भंग केले.

संघात भरपूर पर्याय मार्टिनेझ

सामन्यानंतर पोर्तुगालचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी पिछाडीवरून झुंजार विजय मिळविणाऱ्या आपल्या संघाचे कौतुक केले. ते म्हणाले, `बाकावरील खेळाडूंनी सिद्ध केले की संघात भरपूर पर्याय आहेत.

आम्ही संघटित असल्यामुळेच जिंकू शकलो, गेल्या काही दिवसांत आम्ही लवचिक बनलो आहोत.` संघासाठी पराभव दुर्दैवी असल्याचे चेक प्रजासत्ताकाचे प्रशिक्षक इव्हान हॅसेक यांनी नमूद केले. त्यांनी आपल्या मेहनती खेळाडूंचे आभार मानताना वरचढ ठरलेला पोर्तुगाल संघ विजयासाठी लायक असल्याचेही सांगितले.

दृष्टिक्षेपात...

- सलग ६ युरो करंडक स्पर्धांत खेळणारा पोर्तुगालचा ३९ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिला

फुटबॉलपटू, त्याचे २६ सामन्यांत १४ गोल

- ४१ वर्षे आणि ११३ दिवसांचा पोर्तुगीज बचावपटू पेपे हा युरो करंडकात खेळणारा सर्वांत

वयस्क खेळाडू, त्याची ही पाचवी स्पर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT