euro 2024 substitute savior of defending champions Italy draw against croatia stoppage time goal Sakal
क्रीडा

Euro 2024 : बदली खेळाडू गतविजेत्या इटलीचा तारणहार; भरपाई वेळेतील गोलमुळे क्रोएशियाविरुद्ध बरोबरी

ड्युसलडॉर्फ येथे स्पेनने अल्बानियाला १-० असे पराजित केले. फेर्रान टोर्रेस याने १३व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे तीन वेळच्या माजी विजेत्यांनी ब गटात सलग तिसरा सामना जिंकला.

सकाळ वृत्तसेवा

लायपझिग : बदली खेळाडू मात्तिया झाक्कानी इटलीचा तारणहार ठरला. त्याने भरपाई वेळेतील अखेरच्या आठव्या मिनिटास प्रेक्षणीय गोल केला. त्या बळावर विजयाच्या द्वारी असलेल्या क्रोएशियाला १-१ असे गोलबरोबरीत रोखून गतविजेत्यांनी युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.

ड्युसलडॉर्फ येथे स्पेनने अल्बानियाला १-० असे पराजित केले. फेर्रान टोर्रेस याने १३व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे तीन वेळच्या माजी विजेत्यांनी ब गटात सलग तिसरा सामना जिंकला. त्यामुळे त्यांचे सर्वाधिक नऊ गुण झाले.

क्रोएशियाविरुद्धच्या बरोबरीमुळे इटलीची गुणसंख्या चार झाली व त्यांना गटात दुसरा क्रमांक मिळाला. पहिले दोन्ही संघ बाद फेरीत दाखल झाले. दोन गुणांसह क्रोएशियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला, पुढील फेरीसाठी ते आता प्रतीक्षा यादीत आहेत. एका गुणासह अल्बानियाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.

इटली व क्रोएशिया यांच्यातील सामन्याचा उत्तरार्ध रंगतदार, तेवढाच नाट्यमय ठरला. विश्रांतीनंतर लगेच इटलीचा बदली खेळाडू डेव्हिड फ्रात्तेसी याने चेंडू हाताळल्याबद्दल व्हीएआर पडताळणीनंतर क्रोएशियाला पेनल्टी फटका मिळाला. त्यांचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू लुका मॉड्रिच याच्या फटक्याचा इटालियन गोलरक्षक जाईनलुईजी डोन्नारुम्मा याने अचूक अंदाज बांधला आणि डावीकडे झेपावत चेंडू अडविला.

गोल करण्याची हुकलेली सुरेख संधी मॉड्रिचने लगेच पुढच्या मिनिटास मैदानी गोलने साधली. ५५व्या मिनिटास अँटे बुदिमिर याचा फटका डोन्नारुम्मा याने रोखल्यानंतर मॉड्रिचने क्रोएशियाला रिबाऊंडवर आघाडी मिळवून दिली.

क्रोएशिया ब गटात दुसऱ्या क्रमांकासह बाद फेरी गाठण्याची शक्यता होती; मात्र ८१व्या मिनिटास मैदानात उतरलेला २९ वर्षीय झाक्कानी याने ९०+८ व्या मिनिटास रिकार्डो कालाफिओरी याच्या साह्यावर अप्रतिम फटक्यावर गोल केला आणि इटलीने १-१ अशी बरोबरी साधली. या निकालाने क्रोएशियन खेळाडू हताश झाले.

दृष्टिक्षेपात...

  • ३८ वर्षे व २८९ दिवसांचा असताना गोल करणारा क्रोएशियाचा लुका मॉड्रिच युरो स्पर्धेतील वयस्क फुटबॉलपटू

  • इटली व क्रोएशिया यांच्यातील सलग ४ लढती १-१ गोल बरोबरीत

  • साखळी फेरीत एकही गोल न स्वीकारता स्पेनची आगेकूच, स्पर्धेत पहिल्यांदा

  • २००८ नंतर युरो स्पर्धेत प्रथमच साखळी फेरीत स्पेनचे ३ विजय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लबूशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Ram Naik : अलीकडच्या राजकारणात एकमेकांना नाव ठेवण्याची स्पर्धा : राम नाईक यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT