Lamine Yamal breaks two Pele records sakal
क्रीडा

वेटर आई अन् रंगकाम करणाऱ्या वडिलांच्या लेकाची कमाल; १६व्या वर्षी फुटबॉल विश्व घेतलं कवेत!

Spain vs France, Euro 2024: Lamine Yamal breaks two Pele record - घरी अठरा विश्व दारिद्र्य... फुटबॉलचे शूज खरेदी करण्यासाठी त्याच्या वडिलांना नातेवाईक व शेजाऱ्यांसमोर हात पसरावे लागले होते. आज तोच ३० यार्डवरून एक भन्नाट गोल करून सुपर स्टार झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

- स्वदेश घाणेकर

Spain yougest super star Lamine Yamal - २००७ मध्ये बार्सिलोनाच्या एका लहानशा शहरात जन्मलेला मुलाला अवघा ७ महिन्यांचा असताना तेव्हाचा उगवता तारा लिओनेल मेस्सी सोबत फोटोशूट करण्यासाठी निवडले जाते काय आणि बरोबर १७ वर्षांनी त्याच मुलाची तुलना आता महान खेळाडू झालेल्या मेस्सीसोबतच होते काय! घरी अठरा विश्व दारिद्र्य... फुटबॉलचे शूज खरेदी करण्यासाठी त्याच्या वडिलांना नातेवाईक व शेजाऱ्यांसमोर हात पसरावे लागले होते. आज तोच ३० यार्डवरून एक भन्नाट गोल करून सुपर स्टार झाला आहे...

जर्मनीत सुरू असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत स्पेनने यजमान जर्मनीविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मिसुरडंही न आलेल्या १६ वर्षाच्या पोराला ६३व्या मिनिटाला मैदानावर उतरवले. कुरळे केस, सावळ्या रंगाचा हा मुलगा मैदानावर भिंगरी सारखा भिरभिर करत होता. त्याचे चेंडूवरील ताबा राखण्याचं कौशल्य जर्मनच्या दिग्गजांना थक्क करणारे होते. प्रतिस्पर्धी खेळाडूला चकवा देण्याची कला, हवेच्या लाटेवर स्वार होणाऱ्या चेंडूंवर नियंत्रण मिळवून अचूकतेने तो सहकाऱ्यांकडे सोपवण्याची त्याची जादू मंत्रमुग्ध करणारी ठरली. खेळत नसताना डग आऊटमध्ये हातात पुस्तक घेऊन अभ्यास करणारा हा मुलगा मैदानावर असा करिष्मा दाखवू शकतो, हे त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून कोणाला वाटले नसावे. जर्मनीच्या कामगार कायद्यापासून अल्पवयीन मुलांना रात्री ८ नंतर काम करणे गुन्हा आहे, परंतु खेळाडूंना रात्री ११ पर्यंत ही सूट दिली गेली आहे. त्यामुळेच क्रोएशियाविरुद्धच्या लढतीत त्याला माघारी बोलवून त्याच्याजागी दुसरा खेळाडू पाठवला गेला. तसं केलं नसतं तर स्पॅनिस फुटबॉल असोसिएशनला ३० हजार युरोचा दंड भरावा लागला असता. पण, यमाल छोटा पॅकेट बडा धमाका निघाला.

euro cup who is lamine yamal age lionel messi spain football

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या हातात दिसणारं हे बाळ, एक दिवस फुटबॉल विश्वात भीमपराक्रम करेल हे कुणी स्वप्नातही पाहिले नसावे. एका चॅरिटीसाठी डिआरिओ स्पोर्ट्स या स्थानिक वृत्तपत्रासह UNICEF यांनी हे खास फोटोशूट केलं होतं. मेस्सी तेव्हा २० वर्षांचा होता आणि त्याची फुटबॉल कारकीर्द तेव्हा कुठे बहरत चालली होती. त्या गुबगुबीत इवल्याशा बाळाला हातात घेण्यापूर्वी मेस्सी थोडा दडपणातच आलेला. त्या बाळाला पाण्याने अर्धा भरलेल्या बाथटबमध्ये बसवून हे फोटोशूट करायचं असल्याने मेस्सीही थोडा घाबरला होता, पण बाळाच्या गोंडस हसण्याने तो दडपण विसरून गेला. हे सर्व आता सांगण्याचं कारण हेच की ते बाळ आता १३ जुलै २०२४ ला १७ वर्ष पूर्ण करणार आहे आणि सध्या सुरू असलेल्या युरो चषक स्पर्धेत त्याने विश्वविक्रमी कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

१७ वर्षांपूर्वी मेस्सीच्या अंगाखांद्यावर खेळणारा लामिने यमाल याची जागतिक फुटबॉल विश्वात सर्वत्र चर्चा आहे. ९ जुलैला, म्हणजेच दोन दिवसांपूर्वी लामिने यमाल याने युरो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनसाठी गोल केला आणि फ्रान्सला स्पर्धेबाहेर फेकले. १६ वर्ष व ३६२ दिवसांचा यमाल हा युरो व वर्ल्ड कप स्पर्धेत गोल करणारा इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला. महान फुटबॉलपटू पेले यांनी १७ वर्ष २३९ दिवसांचा असताना हा पराक्रम केला होता. एकीकडे ३७ वर्षाचा मेस्सी कारकीर्दिच्या शेवटाकडे वाटचाल करत असताना १६ वर्षांचा यमाल Next Messi म्हणून उदयास येत आहे. २० वर्षांच्या मेस्सीने जेव्हा त्या टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या बाळाला लाडाने हातात घेतले होते, तेव्हा त्यालाही ते बाळ पुढे फुटबॉलमध्ये नाव गाजवेल, असे मेस्सीलाही वाटले नसावे.

स्पेनच्या कॅटालोनियातील इस्प्लगस डी लोब्रेगाट येथे १३ जुलै २००७ मध्ये यमालचा जन्म. यामलचे वडील मौनीर नास्राओई हे इमारतींना रंगकाम करायचे आणि आई शैला इबाबा या वेटर्स होत्या... १९८८ मध्ये यमालच्या आजीने मोरोक्कोहून स्पेनमध्ये येण्याचा निर्णय घेतला. यमालचे वडील मोरोक्कोन होते, तर आई इक्वेटोरियल जिएना येथील होत्या. त्यामुळे यमालला दोन्ही भाषा येतात. आर्थिक काटकसरीत वाढणाऱ्या यमाल समोरील संकटे इथेच संपणारी नव्हती. ३ वर्षांचा असताना त्याच्या आईवडीलांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही हे दोघं यमालची नीट काळजी घेत होते, पण जगातील सर्व सोंग आणता येतील, परंतु आर्थिक नाही... हेच यमालच्या पालकांसोबत घडले. त्याचं बालपण फारकाही चांगलं गेलं नाही. त्याच्या बुटांची खरेदी करण्यासाठी व फुटबॉल शिबिरात ट्रायलसाठी घेऊन जाण्यासाठी वडिलांना नातेवाईक व शेजाऱ्यांकडून पैसे उधार घ्यावे लागले.

लहान यमालला घेऊन आईने माटॅरो येथून ग्रॅनोलर्सला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने इथे कलाटणी मिळाली... ४ वर्षांचा असताना तो तेथील स्थानिक फुटबॉल क्लब ला टोरेटाकडून खेळू लागला.  एका ट्रायल दरम्यान बार्सिलोना क्लबचे लक्ष यमालने वेधले. ८ वर्षानंतर यमालने आपल्या खेळाने महान खेळाडू झावी हर्नांडेझ त्यावेळी ते बार्सिलोना क्लबचे मॅनेजर असताना प्रभावित केले. यमालचा १० मिनिटांचा सराव पाहून हर्नांडेझने त्याला लगेच वरिष्ठ संघासोबत सराव करण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर त्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.

असे असले तरी तो अजूनही लहान मुलगाच आहे आणि आईची आठवण त्याला सतत येते. त्यामुळे तो आईचा स्कार्फ सतत स्वतःसोबत ठेवतो. त्याच्यासोबत नेमही पुस्तकही दिसतील आणि जेव्हा तो खेळत नसतो तेव्हा तो अभ्यास करतानाही अनेकदा दिसला आहे. घरच्यांचा आठवणीमुळे तो कधीकधी हिरमुसतो, परंतु आपल्या लक्ष्यावरून चित्त विचलीत होऊ देत नाही. आई-वडिलांशी तो फोनवर रोज बोलतो. कालही जेव्हा त्याने आईला कॉल केला तेव्हा आईने विचारले तुला वाढदिवसाला काय गिफ्ट हवंय. त्यावर तो म्हणाला, ''जर आम्ही फायनल जिंकलो, तर तुला मला गिफ्ट म्हणून काहीच खरेदी करण्याची गरज नाही.''  यमालने स्वतःलाच स्वतःला युरो विजेतेपदाचे गिफ्ट देण्याचा निर्धार केला आहे.

खेळ आकड्यांचा...

  • युरो २०२४ मध्ये गोल करण्याच्या सर्वाधिक १६ संधी निर्माण करण्याच्या यादीत लामिन यमालने डेन्मार्कच्या ख्रिस्टीयन एरिक्सनशी बरोबरी केली. जर्मनीचा जोशुआ किमिच व टॉनी क्रूस ( १५) यांना त्याने मागे टाकले.

  • लामिने यमाल हा एकाच युरोपियन चॅम्पियन्सशीप फायनलमध्ये सर्वाधिक १४ गोल करण्याच्या संधी निर्माण करणारा स्पॅनिश खेळाडू ठरला आहे.

  • लामिने यमालने १६ वर्ष व ३६२ दिवसांच्या वयात युरो २०२४ मध्ये गोल केला आणि या स्पर्धेत गोल करणारा तो युवा खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम स्वीत्झर्लंडच्या जोहान व्होनलाथेनने २००४ मध्ये १८ वर्ष व १४१ दिवसांचा असताना गोल केला होता.

  • बार्सिलोना क्लबकडून ला लिगामध्ये २१व्या शतकात स्टार्टिंग इलेव्हनमध्ये खेळणारा लामिने यमाल ( १६ वर्ष व ३८ दिवस) हा युवा खेळाडू ठरला. यापूर्वी २०१२ मध्ये हा विक्रम फॅब्रिस ओलिंगा याने हा विक्रम नावावर केला होता.

  • चॅम्पियन लीगमध्ये लामिने यमालने १६ वर्ष व ६८ दिवसांचा असताना पदार्पण केले आणि बार्सिलोनाकडून या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या अन्स फॅटी याचा सर्वात युवा खेळाडूचा विक्रम यमालने नावावर केला.

  • युरोपा प्रीमिअर क्लबमध्ये स्टार्टिंग इलेव्हनमध्ये खेळणाऱ्या युवा खेळाडूचा ( १६ वर्ष व ८३ दिवस) विक्रमही लामिने यमालने नावावर केला. त्याने कॅलेस्टाईन बाबायारो ( अँडरलेंच) याचा १६ वर्ष व ८६ दिवसाचा विक्रम मोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT