European Football Champions sakal
क्रीडा

European Football Champions : जॉर्जियाची पदार्पणात ऐतिहासिक आगेकूच;माजी युरो विजेत्या पोर्तुगालवर सनसनाटी विजय नोंदवून बाद फेरीत दाखल

युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत यावेळचा सनसनाटी निकाल नोंदविताना नवोदित जॉर्जियाने फ गटात माजी विजेत्या पोर्तुगालला २-० फरकाने खडे चारले. त्यासह त्यांनी पदार्पणातच बाद फेरी (उपउपांत्यपूर्व) गाठण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली.

सकाळ वृत्तसेवा

गेल्झनकिर्झन : युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत यावेळचा सनसनाटी निकाल नोंदविताना नवोदित जॉर्जियाने फ गटात माजी विजेत्या पोर्तुगालला २-० फरकाने खडे चारले. त्यासह त्यांनी पदार्पणातच बाद फेरी (उपउपांत्यपूर्व) गाठण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली. स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक तीन गोल करणारा जॉर्जेस मिकाऊताझे जॉर्जियाच्या धक्कादायक विजयाचा शिल्पकार ठरला.

त्याच्या साह्यावर ख्विका क्वारत्सखेलिया स्पर्धेच्या दुसऱ्या मिनिटास जॉर्जियाचे गोल खाते उघडले. क्वारत्सखेलिया याने सामना सुरू होऊन १ मिनिट व ३४ सेकंदात (९४ सेकंद) केलेला गोल युरो करंडकातील पाचवा वेगवान, तर यंदाचा तिसरा वेगवान गोल ठरला. नंतर उत्तरार्धात पोर्तुगालच्या अंतोनियो सिल्वा याने लुका लोकोश्विली याला अडथळा आणल्यानंतर व्हीएआरद्वारे पेनल्टी फटक्याची निश्चित झाली. ५७ व्या मिनिटास अचूक नेम साधत मिकाऊताझे याने जॉर्जियाची आघाडी बळकट केली.

दोन विजयासह अगोदरच बाद फेरी निश्चित केलेल्या पोर्तुगालचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी जॉर्जियाविरुद्ध लढतीसाठी संघात काही बदल केले, मात्र सुपरस्टार खेळाडू कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो खेळला. विली सॅन्यॉल यांच्या मार्गदर्शनाखालील जॉर्जियाने निर्धारपूर्वक खेळताना रोनाल्डो वरचढ ठरणार नाही याची खात्री बाळगली. पोर्तुगालने दोन विजय व पराभवासह फ गटात सहा गुणांसह अग्रस्थान मिळविले, तर चार गुणांसह जॉर्जियाला गटात तिसरा क्रमांक मिळाला.

चेक`च्या दोघांना `रेड, तुर्कस्तान बाद फेरीत

हॅम्बर्ग येथे फ गटातील लढतीत चेक प्रजासत्ताकच्या दोघांना रेड कार्ड मिळाले. सामन्याच्या विसाव्या मिनिटास अंतोनिन बराक याला दुसऱ्यांदा ताकीद मिळाल्यामुळे मैदान सोडावे लागले. युरो करंडक सामन्यात सर्वांत कमी वेळेत रेड कार्ड मिळण्याची नामुष्की बराक याच्यावर आली. १० खेळाडूंसह चेक प्रजासत्ताकने तुर्कस्तानला कडवी लढत दिली. अखेरीस ९०+४ व्या मिनिटास बदली खेळाडू चेंक टोसुन याने केलेल्या गोलमुळे २-१ फरकाने सामना जिंकून तुर्कस्तानने बाद फेरीत प्रवेश केला. नंतर ९०+८ व्या मिनिटास चेक प्रजासत्ताकच्या टोमास हूरी यालाही रेड कार्ड मिळाले. ५१ व्या मिनिटास तुर्कस्तानच्या हकान चाल्हानोलू याने गोल केल्यानंतर ६६ व्या मिनिटास टोमास सोचेक याने चेक प्रजासत्ताकला बरोबरी साधून दिली होती. तुर्कस्तानचे गटात पोर्तुगालइतकेच सहा गुण झाले, गोलसरासरीत त्यांना दुसरा क्रमांक मिळाला. दुसऱ्या पराभवामुळे एका गुणासह चेक प्रजासत्ताकचे आव्हान संपुष्टात आले.

युक्रेन स्पर्धेतून बाहेर

ई गटातील अखेरचे दोन्ही साखळी सामने बरोबरीत राहिले. रुमानिया, बेल्जियम, स्लोव्हाकिया व युक्रेन या चारही संघांचे प्रत्येकी चार गुण झाले. गोलसरासरीत कमजोर ठरलेल्या युक्रेनला गटसाखळी पार करता आली नाही. स्टुटगार्ट येथे युक्रेन व बेल्जियम यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. फ्रँकफर्ट येथे ३७ व्या मिनिटास राझवान मारिन याने केलेल्या पेनल्टी गोलमुळे रुमानियाने स्लोव्हाकियास १-१ असे बरोबरीत रोखले. त्यापूर्वी २४ व्या मिनिटास स्लोव्हाकियाच्या आंद्रे डुडा याचा हेडर अचूक ठरला होता.

`सामन्यापूर्वी मी खेळाडूंना काय सांगितले हे आठवत नसल्याचे प्रामाणिकपणे सांगतो. फुटबॉल खेळताना तुमच्यापाशी चेंडू नसताना शिस्त पाळा आणि असताना खेळा हाच संदेश होता. १६ किंवा १७ वर्षांचे असताना मनात कोणताही विचार नसताना कसे खेळलात याची आठवण करण्याचे मी त्यांना बजावले. अपेक्षेपेक्षा अधिक उत्कृष्टपणे ते खेळले.`

-विली सॅन्यॉल, जॉर्जियाचे प्रशिक्षक

अशा होतील उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढती

- २९ जून : स्वित्झर्लंड विरुद्ध इटली (रात्री ९.३० वाजता)

- ३० जून : जर्मनी विरुद्ध डेन्मार्क (मध्यरात्री ०.३० वाजता)

- ३० जून : इंग्लंड विरुद्ध स्लोव्हाकिया (रात्री ९.३० वाजता)

- १ जुलै : स्पेन विरुद्ध जॉर्जिया (मध्यरात्री ०.३० वाजता)

- १ जुलै : फ्रान्स विरुद्ध बेल्जियम (रात्री ९.३० वाजता)

- २ जुलै : पोर्तुगाल विरुद्ध स्लोव्हेनिया (मध्यरात्री ०.३० वाजता)

- २ जुलै : रुमानिया विरुद्ध नेदरलँड्स (रात्री ९.३० वाजता)

- ३ जुलै : ऑस्ट्रिया विरुद्ध तुर्कस्तान (मध्यरात्री ०.३० वाजता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT