बंगळुरू : येथे कर्नाटक आणि बडोदा या दोन टीमदरम्यान रणजी ट्रॉफीची मॅच सुरू आहे. मॅच सुरू असताना एका क्रिकेट कमेंटेटरने (समालोचक) केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे.
मॅचची कॉमेंट्री सुरू असताना दोन्ही कमेंटेटरमध्ये हिंदी भाषेवरून संवाद झाला. त्यावेळी एकाने प्रत्येक भारतीय व्यक्तीस हिंदी भाषा आलीच पाहिजे, हिंदी ही आपली मातृभाषा आहे. , असे वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित कमेंटेटरवर टीकेची झोड उठवताना त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
सुशील दोशी असे या कमेंटेटरचे नाव आहे. दोन्ही कमेंटेटरमध्ये बोलणे सुरू असताना दोशी यांनी सुनील गावस्करांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, ''गावस्कर हे सध्या हिंदी कॉमेंट्रीकडे वळले आहेत. त्यांनी हिंदी भाषेत नवे शब्द आणले आहेत. ते डॉट बॉलचा बिंदी बॉल असा उल्लेख करतात. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला हिंदी भाषा आली पाहिजे. ही आपली मातृभाषा असून या व्यतिरिक्त कोणतीही भाषा मोठी नाही.''
ते पुढे म्हणाले की, मी अनेक क्रिकेटपटूंना पाहतो. आपण क्रिकेटर असल्याने त्यांना हिंदीमध्ये बोलण्यास कमीपणा वाटतो. जर तुम्ही भारतात राहत आहात तर तुम्हाला हिंदी आलीच पाहिजे, असे मला वाटते.
दरम्यान, माउंट मौंगानुई येथे बुधवारी झालेल्या तिसऱ्या वनडे मॅचवेळी के.एल.राहुल आणि मनीष पांडे हे एकमेकांशी कन्नडमध्ये बोलत होते. त्यांनी पाचव्या विकेटसाठी १०७ रन्सची पार्टनरशिप केली होती.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळे येथे विविध भाषा बोलणारे लोक राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार, देशातील ४३ टक्के लोक हे हिंदी भाषा बोलतात. त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा किंवा मातृभाषा आहे, याला सबळ पुरावा म्हणता येणार नाही. मात्र, कमेंटेटर हे हिंदी भाषेचं गुणगान गात इतर भाषांचा अपमान करत आहे. जे अतिशय चुकीचं आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
त्यामुळे संबंधित कमेंटेटरवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. आता बीसीसीआय या प्रकरणाची दखल घेत कोणते पाऊल उचलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.