Ex-Pakistan cricketer abdul Razzaq offensive remark on Aishwarya Rai watch video world cup 2023  
क्रीडा

Video : 'जर मी ऐश्वर्या रायशी लग्न केलं तर...', माजी पाकिस्तानी क्रिकेटरचं लाजिरवाणं विधान, आता होतोय ट्रोल

रोहित कणसे

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी ऑलराउंडर खेळाडू अब्दुल रझाक पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. 43 वर्षीय माजी क्रिकेटपटूने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायवर आक्षपार्ह भाषेत वक्तव्य खेल्याने त्याच्यावर चौफेट टीका केली जात आहे. 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानी संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या सुरू असलेल्या गोंधळाबद्दल त्याचे मत विचारले असता, त्याने पीसीबीवर टीका केली आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हीचे उदाहरण दिले, ज्यामुळे तेथे मंचावर उपस्थित सर्वजण हसल्याचे देखील पाहायला मिळालं.

रज्जाक म्हणाला, 'मी त्यांच्या (पीसीबी) हेतूंबद्दल बोलत आहे. जेव्हा मी पाकिस्तानकडून खेळत होतो तेव्हा मला माहित होते की माझा कर्णधार युनूस खानचा संघासाठी चांगला हेतू आहे. त्याच्याकडून मला आत्मविश्वास आणि धैर्य मिळाले. अल्लाहचे आभार, मी पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगली कामगिरी करू शकलो.

तो पुढे म्हणाला, 'सध्या पाकिस्तान संघ आणि वर्ल्डकप खेळाडूंच्या कामगिरीबद्दल येथे खूप चर्चा होत आहे. मला वाटते की खेळाडूंमध्ये सुधारणा आणि विकसीत करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.

तो म्हणाला, 'जर तुम्हाला असं वाटत असेल की मी ऐश्वर्या रायशी लग्न करावं जेणेकरून एक संस्कारी आणि सर्वगुण संपन्न मूल होईल, तर तसं कधीच होणार नाही. त्यामुळे तुमचा हेतू आधी बरोबर ठरवावा लागेल. रज्जाकच्या या वक्तव्यानंतर उपस्थित सर्व जण हसायला लागले.

मात्र, अब्दुल रज्जाकच्या या विधानाचा सर्व स्तरातून समाचार घेतला जात आहे. सोशल मीडियावर लोक त्याला चांगलंच ट्रोल करत आहेत.

पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटू अब्दुल रझाक याने ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहिद आफ्रिदी यांच्यावर केलेले थर्ड क्लास विधान त्यांच्या मीडियासह निर्लज्जपणे हसत आहे -.हे पाकिस्तानच्या लोकांची स्वस्त मानसिकता आणि त्यांच्या देशात त्यांच्या महिलांना दररोज काय त्रास सहन करावा लागतो हे दर्शवते. अनेक सोशल मीडिया य़ुजर्सनी हे वक्तव्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आहेत.

रज्जाकची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

रज्जाकच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने पाकिस्तानसाठी एकूण 343 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 334 डावात 7419 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रज्जाकच्या नावावर सहा शतके आणि 30 अर्धशतके आहेत. गोलंदाजी करताना त्याने इतक्‍याच सामन्यांच्या 352 डावांत 389 बळी मिळवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

SCROLL FOR NEXT