swapnil kusale journey Paris Olympic 2024 sakal
क्रीडा

Exclusive : ग्रामदेवतेला अभिषेक अन् घरात उत्साह! वडिलांनी सांगितली स्वप्नील कुसळेच्या जिद्दीची कहाणी

Swadesh Ghanekar

- स्वदेश घाणेकर

India at Paris Olympic 2024 Swapnil Kusale - महाराष्ट्राच्या राधानगरी येथे ६ ऑगस्ट १९९५ साली जन्मलेला स्वप्नील कुसाळे आज पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ऐतिहासिक पदक जिंकून देण्यासाठी जीवाचे रान करणार आहे. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या फायनलमध्ये स्वप्नील पदकासाठी खेळणार आहे आणि तो पदक नक्की जिंकेल असा विश्वास त्याच्या घरच्यांना होता आणि तो स्वप्नीलने सार्थ ठरवला.

ऑलिम्पिक मॅच पाहण्यासाठी बारावीच्या पेपरला दांडी

२००८ मध्ये अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्वप्नीलला प्रेरणा मिळाली. ती मॅच पाहण्यासाठी त्याने १२ वीचा पेपरही बुडवला होता. २००९ मध्ये त्याच्या नेमबाजीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आज तो पॅरिस ऑलिम्पिक गाजवायला सज्ज झाला आहे. आजच्या लढतीपूर्वी त्याचे वडील सुरेश यांच्याशी ( Suresh Kusale ) 'सकाळ' डिजीटलने गप्पा मारल्या..

जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक असलेले सुरेश कुसळे हे सांगतात,'' स्वप्नीलची मेहनत आणि त्याच्या चिकाटीचे हे फळ आहे. त्याने सरावासाठी कधी आळस केला नाही. एकवेळ तो जेवणार नाही, पण त्याने कधीच सराव थांबवला नाही. मला खात्री आहे की तो आजच्या फायनलमध्ये पदकाला गवसणी घालेल.. त्याची कोच ( दिपाली देशपांडे) यांच्या प्रती असलेली श्रद्धा खूप आहे. तो त्यांना आईसमान मानतो... तो खूप भावनिक आहे आणि जी मुलं भावनिक असतात ती कधीच कुठे कमी पडत नाही.''

प्राथमिक शिक्षक असलेल्या सुरेश कुसाळे यांनी स्वप्नीलच्या प्रवासाबाबत सांगितले. ते म्हणाले, '' सातव्या इयत्तेत असताना त्याची क्रीडा प्रबोधिनीला निवड झाली. आता आपण स्पर्धा परिक्षा पाहिलं तर लाखातून एखादा मुलगा यशस्वी होतो. यात आपला मुलगा टिकाव धरेल का? हा प्रश्न मला पडलेला आणि म्हणून मी त्याला वेगळा मार्ग दाखवला. आठवीत असताना त्याने रायफलची निवड केली आणि नाशिकच्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये त्याने प्रशिक्षण घेतले.''

पहिल्यांदा बंदुक हातात घेतली अन्...

सुरेश पुढे सांगतात,''तो पहिली ते चौथी तो गावात शिकला आणि पाचवी ते सातवी तो कोल्हापूरच्या शाळेत शिकला. आठव्या इयत्तेत त्याची निवड झाल्यानंतर तो सांगलीत स्पोर्ट्स सेंट्रलपासून जवळ असलेल्या शाळेत गेला. नववीत असताना त्याला सायकलिंग की रायफल यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आणि त्याने रायफल उचलली. पहिल्यांदा त्याला रायफल दिली तेव्हा त्याने १० पैकी नऊ शॉट्स अचूक मारले. तेव्हा त्याला बंदुक माहित नव्हती, त्यातली इतर माहिती तर सोडाच.''

मलेरिया झाल्याचे घरच्यांना कळू दिले नाही...

''क्रीडा संकुलात जेव्हा त्याचं सिलेक्शन झालं तेव्हा तिथल्या ऑफिसरने मेडिकल चेक अपच्या वेळी त्याला तू मुलगा आहेस की मुलगी असे विचारले. कारण तेव्हा तो गोरापान होता आणि शरीर एकदम कमकुवत होते त्यामुळे तेही कन्फ्युज झाले,'' असे वडील सांगतात.

त्यांनी पुढे म्हटले,''भोसला मिलिटरी शाळेत असताना त्याला मलेरिया झालेला आणि ४-५ दिवस सलग ताप होता. त्याच्यासोबतची मुलं त्याला डब्बा आणून द्यायची, पण त्याने आम्हाला काहीच कळू दिलं नाही. आम्हाला काहीतरी शंका आली आणि आम्ही तातडीने नाशिकला निघालो. भोगावती गावाजवळ त्याची तपासणी केली. तिथले डॉक्टर म्हणाले, आणखीन उशीर केला असता तर कठीण झालं असतं. तेव्हा त्याच्या शरीरात ५४ हजार प्लेटलेट्स होत्या.त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तो क्षण बाप म्हणून खूप कठीण होता. पण त्यातून बरं झाल्यानंतर त्याने मागं वळून पाहिले नाही.''

कर्ज काढलं पण परदेशी धाडलं

पिस्तुल हा खर्चिक खेळ आहे आणि त्याचे दडपण वडिलांनी कधीच स्वप्नीलवर येऊ दिले नाही. ते सांगतात,''२०१२ मध्ये त्याची जर्मनीतल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिल्यांदा निवड झाली आणि तेव्हा मी दीड लाखाचं कर्ज घेऊन त्याला पाठवलं. त्या स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पण, त्याने पुन्हा कसून सराव केला आणि २०१५ मध्ये १८ पेक्षा कमी वय असताना केरळमध्ये खुल्या गटात रौप्यपदक जिंकले.''

२५ लाखांचं कर्ज...

''नेमबाजी हा खेळ खूप खर्चिक आहे, पण याचा विचार आम्ही केला नाही. आतापर्यंत आम्ही २० ते २५ लाखांपर्यंत कर्ज काढलं आणि ते आता फिटलंही आहे. जेव्हा तो रेल्वेत कामाला लागला तेव्हा खर्चाची जबाबदारी त्याने स्वतः घेतली,'' असे सुरेश यांनी सांगितले. स्वप्नील २०१५ पासून भारतीय रेल्वेत मध्य रेल्वेच्या पुणे विभागात TTE म्हणून काम करतोय.

घरात काय तयारी?

स्वप्नीलच्या फायनलपूर्वी घरचे खूप उत्साही आहेत. त्याचे वडील सांगतात, आज स्वप्निलच्या फायनलपूर्वी आम्ही ग्रामदेवतेला अभिषेक केला आहे. त्याची आई गावची सरपंच आहे, तिने आणि सहकाऱ्यांनी फार कौतुकाने सारा विभाग स्वच्छ करून घेतला आहे. मला शंभर टक्के खात्री आहे तो पदक जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वडिलांचा विश्वास सार्थ

मला खात्री होती, स्वप्नील पदक जिंकेल. गेल्या १२-१३ वर्षांची तपश्चर्या कामी आली. त्याने भारताचा तिरंगा फडकवला याचा मला अभिमान आहे, असे त्याचे वडील सुरेश कुसळे म्हणाले. आई अनिता कुसळे यांनीही खूप आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू भरून आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT