neeraj chopra vs Arshad nadeep esakal
क्रीडा

Neeraj Chopra: नीरज चोप्राच्या हातून 'गोल्ड' केव्हा निसटले? Explainer जो सर्व प्रश्नांची उत्तर देईल

Swadesh Ghanekar

India at Paris Olympic 2024 Neeraj Chopra Silver : विनेश फोगाट प्रकरणानंतर भारतीयांना पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी मध्यरात्री १.१०च्या सुमारास आणखी एक मोठा धक्का बसला. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याला जेतेपद कायम राखता आले नाही. नीरज हरला यापेक्षा पाकिस्तानचा अर्शद नदीम ( Arshad Nadeem) हा सुवर्ण घेऊन गेला, याचे अनेकांना दुःख नक्की झाले असेल. पण, हे कसे काय झाले? नीरजचे हक्काचे सुवर्णपदक कसे गेले? चला जाणून घेऊया...

मागच्या वर्षी जेव्हा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजला सुवर्ण आणि अर्शदला रौप्यपदक मिळाले होते, तेव्हा पाकिस्तानी भालाफेकपटूने मला पॅरिस ऑलिम्पिकमध्येही India-Pakistan असे अव्वल दोन स्थानांवर पाहायचे आहे, असे म्हटले होते. आज त्याने त्याचा निर्धार सत्यात उतरवला.

प्रत्यक्ष सामन्यात काय घडलं?

पाकिस्तानचा अर्शद नदीम पहिल्या प्रयत्नासाठी जेव्हा रन अप घेऊन येत होता, तेव्हा तो मध्येच थांबला... घड्याळ्याचे काटे पळताना पाहून त्याने मधूनच सुरुवात केली, परंतु त्याचा पहिला प्रयत्न अमान्य ठरवला गेला. तेच नीरजनेही पहिला प्रयत्नात फाऊल केला. अर्शद मात्र दुसऱ्या प्रयत्नात जबरदस्त कामगिरी करण्याच्या इराद्यानेच आला आणि त्याचा भाला थेट ९२.९७ मीटर लांब पडला. हा त्याने नीरजसह अन्य प्रतिस्पर्धींवर केलेला पहिला आणि मोठा मानसिक हल्ला होता.

अर्शदीने नवा ऑलिम्पिक आणि आशियाई विक्रम स्वतःच्या नावावर केला. त्यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटर लांब भाला फेकला आणि सीझनमधील सर्वोत्तम कामगिरीसह सामन्यात पुनरागमनाची आशा दाखवली. पण, त्याचवेळी ग्रेनाडाचा अँडरसन पीटर हाही शर्यतीत नीरजला टक्कर देईल असे वाटत होते.

नदीमने ९२.९७ मीटर अशी विक्रमी भाला फेक करून स्वतःला सेफ केले होते. पण, आता नीरजला नदीमलाही हरवायचे होते आणि अँडरसनलाही मागे ठेवायचे होते. या दुहेरी कात्रीत नीरजकडून पुढील चारही प्रयत्न फाऊल झाले. नीरजचे हतबलता त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होती. पीटरला ८८.५४ मीटरपर्यंतच मजल मारता आली आणि तो कांस्यपदकावर समाधानी राहिला. नीरजला शेवटच्या प्रयत्नात ९३ मीटर भाला फेकायचा होता, परंतु दडपणात त्याच्याकडून पुन्हा फाऊल झाला. तेच सुवर्ण पक्के झाले, हे कळताच नदीमने शेवटच्या प्रयत्नातही ९० मीटर अंतर पार केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024 : भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात; पाकिस्तानने विश्वासाला तडा दिला, आपला संघ बाहेर गेला

Bharatvakya Book Publication : ‘भरतवाक्य’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कोअर कमिटीची 4 तास बैठक; भाजप उमेदवार कधी निश्चित करणार? मिटींगनंतर तारीख सांगितली, जाणून घ्या...

अतुल यांच्या निधनानंतर व्हायरल होतोय त्यांचा जगणं शिकवणारा व्हिडिओ; म्हणालेले- समोरच्यासाठी आपण काय आहोत...

SCROLL FOR NEXT