Fabian Allen Attacked And Robbed At Gunpoint Outside Team Hotel Says Report Cricket News In Marathi  sakal
क्रीडा

Fabian Allen : डोक्यावर बंदूक ठेवून लुटलं! थोडक्यात वाचला मुंबई इंडियन्सच्या माजी ऑलराऊंडरचा जीव

खेळाडूला बंदुकीचा धाक दाखवून लुटले...

Kiran Mahanavar

Fabian Allen News : सध्या दक्षिण आफ्रिकेत SAT20 क्रिकेट लीगची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. या लीगमध्ये चाहत्यांना दररोज आणखी रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. मात्र, या लीगच्या मध्येच मोठी घटना घडली आहे, ज्याने सर्वांनाच धक्का बसला. वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर फॅबियन ॲलनला हॉटेलबाहेर बंदुकीचा धाक दाखवत लुटण्यात आले.

ही संपूर्ण घटना जोहान्सबर्गमध्ये घडली. फॅबियन या लीगमध्ये पार्ल रॉयल्सकडून खेळत आहे. या घटनेची माहिती SAT20 आणि क्रिकेट वेस्ट इंडिजच्या सूत्रांनी दिली. क्रिकबझला या घटनेची माहिती देताना क्रिकेट वेस्ट इंडिजच्या एका सूत्राने सांगितले की, 'यामध्ये फॅबियनचे कोणतेही नुकसान झालेले नाही. आमचे मुख्य प्रशिक्षक आंद्रे कोली हे फॅबियनशी बोलले आहे. तो ठीक आहे. फॅबियनसोबतच्या या घटनेनंतर SAT20 लीगमधील खेळाडूंच्या सुरक्षेबाबत तणाव वाढला आहे.

या हल्लेखोरांनी फॅबियनला सँडटन सन हॉटेलच्या बाहेर घेरले आणि त्याचा फोन, बॅग आणि अनेक वैयक्तिक वस्तू जबरदस्तीने काढून घेतल्या. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर क्रिकेट विश्वातील सर्वांनाच धक्का बसला आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की, SAT20 लीग आता अंतिम टप्पात पोहोचली आहे. या लीगमधील क्वालिफायर सामने 6 फेब्रुवारीपासून सुरू होतील. या लीगचा अंतिम सामना 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये फॅबियन ॲलन मुंबई इंडियन्सचा एक भाग होता. मात्र, आयपीएल 2024 साठी झालेल्या लिलावात तो विकल्या गेला नाही. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT