Babar Azam  esakal
क्रीडा

Babar Azam PAK vs NED : बाबर - रिझवान महाकालच्या चरणी लीन... काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य?

अनिरुद्ध संकपाळ

Babar Azam Mohammad Rizwan : पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात दाखल झाला त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत झाले. हैदराबादमध्ये दमदार खातीरदारी करण्यात आल्यानंतर आज ते वर्ल्डकपमधील पहिला सामना खेळणार आहे.

मात्र याच दरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचा एक आश्चर्यकारक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत हे दोन स्टार क्रिकेटर मध्य प्रदेशातील उजैनमधील महाकाल मंदिरात गेल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल झाल्यानंतर याबाबतची सत्यता पडताळून पाहण्यात आली. द लल्लनटॉप आणि अनेक हिंदी माध्यमांनी या व्हायरल होत असलेल्या फोटची पोल खोल केली आहे.

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने महाकालचे दर्शन घेतले हा दावा खोटा आहे. गुगलवर सर्च केल्यानंतर याबाबतचा कोणताही ठोस पुरावा आढळून आलेला नाही.

दरम्यान, या व्हायरल फोटोची की फ्रेम ही गुगल लेन्सद्वारे सर्च केल्यानंतर 23 जानावेरी रोजी छापण्यात आलेल्या एका बातमीचा फोटो मिळाला. बाबरचा हा व्हायरल होत असलेला फोटो हा बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानचा नसून तो भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंतचा असल्याचे आढळून आले आहे.

भारताच्या या स्टार क्रिकेटपटूंनी मध्यंतरी महाकाल मंदिराला भेट दिली होती. या फोटोत सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादव हे मंदिरात हात जोडून उभे होते. हाच फोटो एडिट करून त्याला बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानचा फोटो लागवण्यात आला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT