KL Rahul Retirement  esakal
क्रीडा

Fact Check: KL Rahul ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून Retirement? इंस्टाग्राम स्टोरीमुळे उडाली खळबळ

Swadesh Ghanekar

KL Rahul Retirement post - भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज लोकेश राहुल याच्या निवृत्तीच्या वृत्ताने क्रिकेटविश्वाला धक्का बसलेला पाहायला मिळतोय... लोकेशने त्याच्या इंस्टास्टोरीवर काहीतरी मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले होते आणि त्यानंतर काही तासातच लोकेशच्या नावे सोशल मीडियावर निवृत्ती घेतल्याची पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे भारताचा स्टार फलंदाज खरंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला का, याची चर्चा सुरू झाली... चला जाणून घेऊयात पोस्ट मागचं सत्य...

दुलीप ट्रॉफीतून भारतीय संघात परतण्याचा प्रयत्न..

लोकेश राहुल काहीकाळापासून भारतीय संघाबाहेर आहे. संघात पुनरागमनासाठी त्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि आगामी दुलीप ट्रॉफीत दमदार कामगिरी करून ही संधी साधण्याचा त्याचा निर्धार आहे. ५ सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफीची सुरुवात होत आहे आणि त्या स्पर्धेतील कामगिरीवर १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ निवडला जाणार आहे. रिषभ पंत यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून शर्यतीत आघाडीवर आहे, परंतु लोकेशला पुनरामनाची आशा आहे.

लोकेश राहुलने नेमकी पोस्ट काय होती?

भारतीय संघ निवडीत भेदभाव होत असल्याने नाराज झाल्याने लोकेश राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला जात आहे. पण, या पोस्टपूर्वी लोकेशच्या अधिकृत इंस्टा अकाऊंटवर मला काहीतरी घोषणा करायची आहे, कुठेही जाऊ नका... अशी स्टोरी टाकली होती. त्यानंतर त्याच्या नावाने आणखी एक पोस्ट व्हायरल झाली...

KL Rahul Retirement

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये काय?

खूप विचार केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपा नक्कीच नव्हता.. माझ्या आयुष्यात क्रिकेटचे खूप महत्त्व आहे. माझ्या कुटुबियांनी या प्रवासात मला दिलेल्या पाठिंब्याचा मी आभारी आहे. मी आयुष्याच्या नवीन चॅप्टरची सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे... असे भरपूर काही या पोस्टमध्ये लिहिले आहे...

KL Rahul Retirement

ही पोस्ट खरी की खोटी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेली निवृत्तीची पोस्ट खोटी आहे. लोकेशने अशी कोणतीच घोषणा केलेली नाही आणि व्हायरल पोस्ट हा कोणाचातरी खोडसाळपणा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT