England Vs Pakistan Final  sakal
क्रीडा

Eng Vs Pak Final : असली-नकली 'मिस्टर बीन' मध्ये लढाई, फायनल सामन्याआधी मीम्सचा पाऊस

टी-20 वर्ल्ड कपमध्ये मिस्टर बीन खूप चर्चेत आला होता, ज्याचा मुद्दा पाकिस्तानशी संबंधित होता

Kiran Mahanavar

England Vs Pakistan Final T-20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून सर्वांच्या नजरा मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक युद्ध सुरू झाले आहे. इंग्लंड आणि पाकिस्तानमधील या युद्धाला लोकांनी असली-नकली मिस्टर बीनमधील लढाई असे नाव दिले आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये मिस्टर बीन खूप चर्चेत आला होता, ज्याचा मुद्दा पाकिस्तानशी संबंधित होता.

इंग्लंड-पाकिस्तान आमने-सामने आल्याने चाहते याला खऱ्या-खोट्या मिस्टर बीनची लढाई म्हणत आहेत. कारण मिस्टर बीनची भूमिका करणारा अभिनेता रोवन एटकिंसन मूळचा युनायटेड किंगडमचा आहे. बनावट मिस्टर बीन म्हणजेच आसिफ मोहम्मद पाकिस्तानी आहे. सोशल मीडियावर दोघांबद्दल अनेक प्रकारचे मीम्स येत आहेत. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्याने नवा वाद सुरू केल्याने बनावट मिस्टर बीन खूप प्रसिद्ध झाला होता.

झिम्बाब्वे मध्ये स्थानिक कार्यक्रम 'अॅग्रिकल्चर शो'मध्ये खऱ्या बीनऐवजी त्यांनी पाकिस्तानची बनावट बीन पाठवला होता. यानंतर ट्विटरवर बरेच मीम्स बनवले गेले आणि नंतर झिम्बाब्वेने पाकिस्तानला 1 धावाने पराभूत केले. झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनीही ट्विट करून पाकिस्तानला ट्रोल केले आणि खऱ्या मिस्टर बीनलाच रिअल टाइमसाठी पाठवत असल्याचे लिहिले तेव्हा हा वाद आणखी वाढला. यामुळेच टी-20 वर्ल्ड कपदरम्यान ही लढत सोशल मीडियावर चांगलीच गाजली होती.

टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सामना होणार आहे. बाबर आझम आणि जोस बटलर यांच्या नेतृत्वाखालील संघ रविवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर आमने-सामने येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT