Team India : टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला उपांत्य फेरीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यासह इंडियाच्या विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. टीम इंडिया गेल्या 15 वर्षांपासून टी-20 वर्ल्ड कपची वाट पाहत होती, या पराभवानंतरचा परिणाम दिसू लागला आहे. बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण निवड समिती बरखास्त केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही घोषणा झाल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले.
सोशल मीडियावर यानंतर चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते, कारण गेल्या वर्षभरात घडलेल्या प्रकारामुळे प्रत्येकजण नक्कीच निराश झाला होता. तसेच, सोशल मीडियावर चाहत्यांनी याला कर्म म्हटले आहे, कारण निवडकर्त्यांनी विराट कोहलीला ज्या प्रकारे कर्णधार पदावरून हटवले, त्यामुळे त्याचे चाहते खूप नाराज झाले होते.
टी-20 विश्वचषक 2022 नंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली. वर्षापूर्वी म्हणजे 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीला कर्णधार काढले होते. त्यानंतर विराट कोहली आणि निवड समितीमध्ये बराच वाद झाला, याशिवाय कोहलीचे सौरव गांगुलीसोबतही मतभेद झाले. चाहत्यांनी मीम्सद्वारे आठवण करून दिली की सौरव गांगुली आता बीसीसीआय अध्यक्ष नाही, चेतन शर्मा आता निवड समितीचे अध्यक्ष नाहीत. पण किंग कोहली अजूनही किंग आहे.
टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती, जिथे इंग्लंडने त्यांचा 10 विकेट्सने पराभव केला होता. आयसीसी स्पर्धांतील सततच्या पराभवामुळे चाहते संतापले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.