T20 WorldCup esakal
क्रीडा

T20 WorldCup: विराट अन् टीम इंडियासाठी गायलं खास गाणं, Video

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया अॅडलेडमध्ये दाखल झाली आहे. अॅडलेडला पोहचताच टीमचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. (Fans Welcome Virat Kohli and Team India With Special Song viral video)

टीम इंडियाच्या चाहत्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत केले. चाहत्यांनी केलेलं स्वागत पाहून टीम इंडियाचे खेळाडूही चकित झाले. फॅन्स इंडिया नावाच्या ग्रुपने गाणे गाऊन टीमचे विमानतळावर स्वागत केले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, विराट कोहली विमानतळाच्या पायऱ्या उतरत असताना फॅन्स इंडिया ग्रुपमधील एक व्यक्ती त्याच्या स्वागतात गाणे गातो आणि सॅक्सोफोन वाजवतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

टी-20 वर्ल्ड कप 2022 चा दुसरा सेमीफायनल सामना टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 10 नोव्हेंबरला अॅडलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे.

सामन्याच्या वेळा काय आहेत?

• न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - 9 नोव्हेंबर, सिडनी (दुपारी 1.30)

• भारत विरुद्ध इंग्लंड - 10 नोव्हेंबर, अॅडले अॅडलेड (दुपारी 1.30)

सेमिफायनलमध्ये पोहोचलेले संघ

• ग्रुप-1: न्यूझीलंड, इंग्लंड

• गुप-2: भारत, पाकिस्तान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

Satara Crime : घरात जेवण बनविण्याच्या वादातून पतीने केला पत्नीचा खून; लाथाबुक्क्या, लाकडी काठीने बेदम मारहाण

'या' तारखेला सामांथाचा पूर्वाश्रमीचा नवरा अडकणार पुन्हा लग्नबंधनात ; पत्रिकेचा फोटो झाला व्हायरल

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : निवडणूक प्रचाराकडे रोजंदारी मजुरांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT