farewell to James Anderson England beat West Indies by 114 runs Sakal
क्रीडा

James Anderson : जेम्स अँडरसनला विजयाने निरोप; इंग्लंडची वेस्ट इंडीजवर डाव व ११४ धावांनी मात

सकाळ वृत्तसेवा

लॉर्ड्‌स ­­: वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन शुक्रवारी निवृत्त झाला. इंग्लंडने वेस्ट इंडीजवर एक डाव व ११४ धावांनी मात करीत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जेम्स अँडरसनला विजयाने निरोप देण्यात आला. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण ७०४ विकेट मिळवल्या. अखेरच्या कसोटीत त्याने चार फलंदाज बाद केले.

गस ॲटकिन्सन (७/४५ व ५/६१) याने बारा फलंदाज बाद करीत कसोटी गाजवली. जवळपास अडीच दिवसांच्या आतमध्ये हा कसोटी सामना संपला. वेस्ट इंडीजची अवस्था गुरुवारी अखेरीस सहा बाद ७९ धावा अशी बिकट झाली होती. शुक्रवारी पहाटे त्यांचा दुसरा डाव १३६ धावांवरच संपुष्टात आला.

पहिल्या डावात प्रभावी कामगिरी करणाऱ्या गस ॲटकिन्सन याने दुसऱ्या डावातही ठसा उमटवला. त्याने ६१ धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जेम्स अँडरसनने ३२ धावा देत तीन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक ­­: वेस्ट इंडीज- पहिला डाव सर्व बाद १२१ धावा व दुसरा डाव सर्व बाद १३६ धावा (एलिक एथानेझ २२, जेसन होल्डर २०, गुडाकेश मोती नाबाद ३१, गस ॲटकिन्सन ५/६१, जेम्स अँडरसन ३/३२) पराभूत वि. इंग्लंड- पहिला डाव सर्व बाद ३७१ धावा.

महत्त्वपूर्ण आकडेवारी

- जेम्स अँडरसन १८८ कसोटी सामने खेळला. तो सचिन तेंडुलकरनंतर (२०० कसोटी) सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू ठरला.

- जेम्स अँडरसनने लॉर्ड्‌स येथे सर्वाधिक १२३ विकेट मिळवले. एका मैदानात मुथय्या मुरलीधरन याने सर्वाधिक १६६ विकेट मिळवल्या आहेत. त्याने कोलंबो येथे ही किमया केली. त्यानंतर अँडरसनचा क्रमांक लागतो.

- जेम्स अँडरसनने कसोटीत एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट ३२ वेळा मिळवले. पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट सर्वाधिक वेळा मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे.

- जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर १९९ झेल यष्टिरक्षकांकडून पकडण्यात आले. सर्वाधिक झेल यष्टिरक्षकांकडून पकडणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अँडरसन पहिल्या स्थानावर आहे.

- क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत (कसोटी, एकदिवसीय व टी-२०) एका मैदानात सर्वाधिक १४१ विकेट मिळवत जेम्स अँडरसनने तिसरा क्रमांक मिळवला. लॉर्ड्‌स येथे त्याने किमया करून दाखवली. शाकीब उल हसनने ढाकामध्ये २५२, तर मुथय्या मुरलीधरनने कोलंबोमध्ये १८८ विकेट मिळवल्या आहेत.

एक काळ असा होता की विराट कोहलीला कोणत्याही चेंडूवर बाद करू शकतो असा विचार मनामध्ये यायचा, पण आता त्याला बाद करूच शकत नाही असे वाटते. याचाच अर्थ प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत चढ-उतार येतच असतात. दुखापती, निवडप्रकिया, संघातून वगळण्यात येणे अशा बाबींचा अडथळा मलाही आला, पण माझ्या खेळातील कौशल्याच्या जोरावर सातत्याने संघात पुनरागमन केले.

- जेम्स अँडरसन, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT