Offside rule in Football : आपल्या सगळ्यांना वाटते तसं फुटबॉलचे नियम बहुतेक सोपे आहेत, पण याला अपवाद आहे तो म्हणजे ऑफसाइड नियमाचा. हा नियम पहिल्यांदा 1883 साली लागू करण्यात आला होता. विरोधी संघाच्या गोलच्या जवळ असलेल्या खेळाडूंना लगेच गोल करण्यापासून रोखण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला.
ऑफसाईड नियम काय आहेत?
जेव्हा कुठलाही खेळाडू गोल करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या हाफमध्ये जातो तेव्हा, त्याच्या सहकाऱ्याने पास दिल्यानंतर त्याच्या आजूबाजूला किमान दोन खेळाडू असणे गरजेचे असते. पास मिळाल्यानंतर तो खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या सर्व खेळाडूंच्या पुढे गोलकीपरसमोर असेल तर त्याला ऑफसाइड ठरवले जाते.
ऑफसाइड कधी नसते?
मात्र कुठलाही पास न घेता खेळाडू स्वतः ड्रिबल करत बॉल घेऊन सर्व प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या पुढे गोलपोस्टजवळ गेला असेल तर तो ऑफसाइड ठरत नाही. तसेच एखाद्या खेळाडूने स्वतःच्या संघाच्या गोलकिपरला पास दिला आणि मध्येच प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडून बॉलचा ताबा मिळवला तरी तो ऑफसाइड ठरत नाही.
'हा' नियम का हवा?
ऑफसाइड नियमाशिवाय, खेळाडू दूरचा पास देत बॉल थेट विरोधी गोलजवळच्या जवळ असलेल्या खेळाडूला देऊ शकतात किंवा खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या 'डी' एरियामध्ये कायमचा तळ ठोकू शकतात. त्यामुळे फुटबॉल खेळामध्ये कौशल्य आणि रणनीतीला काही अर्थच उरत नाही. यामुळे खेळ रटाळ आणि निरस होऊ जाईल, म्हणून हा नियम महत्वाचा ठरतो. चला तर मग फुटबॉलमधील ऑफसाइडचे नियम नेमके काय आहेत जाणून घेऊया.
ऑफसाइड ठरवल्यानंतर काय?
ऑफसाइड दिल्यानंतर संघ चेंडूचा ताबा गमावतो आणि जेथे ऑफसाईड दिली तेथून प्रतिस्पर्धी संघाला फ्री किक मिळते. ऑफसाईड पोझिशनवरून केलेले गोल देखील बाद ठरवले जातात.
आडवी रेषा ठरवते ऑफसाइड
खेळाडू ऑफसाइड गेला की नाही यावर मुख्य पंच यांच्यासोबत मैदानाच्या बाजूला असणारे दोन पंच लक्ष ठेवून असतात. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलमध्ये खेळाडूला इतर खेळाडूने पास दिला तर तो खेळाडू इतर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या बरोबरीने आडव्या रेषेत आहे की पुढे यावर पंच लक्ष ठेवून असतात. खेळाडू पुढे असेल तर झेंडा फडकवत ऑफसाइडची शिट्टी वाजते. अधुनिक तंत्रज्ञान वापरून देखील या अडव्या सरळ रेषेची मदत घेतली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.