FIFA World Cup 2022 Argentina Penalty Shootout : फिफा वर्ल्डकप फायनलमध्ये पहिल्यापासून आक्रमक खेळ करणाऱ्या अर्जेंटिनाला फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने चांगलेच झुंजवले. त्याने गोलची हॅट्ट्रिक करत एक्स्ट्रा टाईममध्ये गेलेला सामना 3 - 3 असा बरोबरीत आणला. मात्र अर्जेंटिनाने शेवटपर्यंत झुंज देत गतविजेत्यांना पेनाल्टी शूटआऊटमध्ये 4 - 2 अशी पराभवाची धूळ चारली. याचबरोबर अर्जेंटिनाने पेनाल्टी शूटआऊटवर विजय मिळवण्यात विश्वविक्रम देखील केला.
अर्जेंटिनाने फ्रान्सविरूद्धची पेनाल्टी शूटआऊट 4 - 2 अशी जिंकत आपला वर्ल्डकपमधील सहावा पेनाल्टी शूटआऊटमधील सामना जिंकला. याचबरोबर अर्जेंटिना वर्ल्डकप इतिहासातील सर्वात जास्त पेनाल्टी शूटआऊटमधील सामने जिंकणारी एकमेव टीम ठरली.
आतापर्यंतच्या वर्ल्डकप इतिहासातील फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सवर मिळवलेला पेनाल्टी शूटआऊटमधील हा तिसरा विजय ठरला. यापूर्वी 1994 मध्ये ब्राझील विरूद्ध इटली आणि 2006 मध्ये इटली विरूद्ध फ्रान्स यांच्यातील वर्ल्डकप फायनल सामना पेनाल्टी शूटआऊटवर गेला होता.
अंगावर शहारे आणणारा पेनाल्टी शूटआऊट
एम्बाप्पेने पहिली पेनाल्टी गोल करत 1 - 0 अशी आघाडी घेतली.
मेस्सीने पहिली पेनाल्टी अचूक मारत 1 - 1 अशी बरोबरी साधली.
अर्जेंटिनाच्या मार्टिनेझने फ्रान्सची दुसरी पेनाल्टी सेव्ह केली.
त्यानंतर पॉल डयबालाने अर्जेंटिनासाठी गोल करत 2 - 1 अशी आघाडी घेतली.
फ्रान्सने तिसरी पेनाल्टी मिस केली. मात्र अर्जेंटिनाने तिसरी पेनाल्टी मार आघाडी 3 - 1 अशी केली.
त्यानंतर फ्रान्सच्या मुआनीने गोल केला. मात्र अर्जेंटिनाच्या गोंझालो माँटेअलने निर्णायक पेनाल्टी यशस्वीरित्या मारत अर्जेंटिनाला 4 - 2 असा विजय मिळवून दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.