FIFA World Cup 2022 Budweiser breaks silence on beer ban in Qatar stadiums kgm00 
क्रीडा

FIFA World Cup : मद्यबंदीच्या निर्णयामुळे फिफाचे 612 कोटींचे नुकसान

सकाळ ऑनलाईन टीम

Fifa World Cup 2022 : जागतिक फुटबॉल स्पर्धेला येत्या रविवारपासून कतारमध्ये सुरुवात होणार आहे. प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच फिफाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फुटबॉल लढतीदरम्यान स्टेडियममध्ये मद्यविक्रीवर बंदी लावण्यात आली आहे. यामुळे आता फिफाचा बडवायझर या बीअर कंपनीसोबतचा करार अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. तसेच यामुळे या करारामुळे मिळणाऱ्या ६१२ कोटी रुपयांवरही त्यांना पाणी सोडावे लागू शकते.

आखाती देशात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे बेकायदेशीर आहे. काही दिवसांपूर्वी असे वाटले होते की, मद्यावर कडक नियंत्रण असलेला कतार हा देश फुटबॉल महोत्सवासाठी त्यांचे कायदे शिथिल करेल. पण प्रत्यक्षात असे झाले नाही. कतारसमोर फिफाला दुसऱ्यांदा झुकावे लागले आहे.

स्टेडियममध्ये विक्रीला बंदी

यजमान देश कतार येथील अधिकारी आणि फिफा यांच्यातील चर्चेनंतर स्टेडियम्समध्ये बिअर विकता येणार नाही असे ठरवण्यात आले आहे. फिफा फॅन फेस्टिव्हल, इतर चाहत्यांची ठिकाणे आणि परवानाकृत स्थळ येथे मद्यपेयांच्या विक्रीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे फिफाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. विश्वकरंडकाचे प्रमुख प्रायोजक बडवाझरला अंतिम फेरीत बिअर विकण्याचे विशेष अधिकार आहेत आणि ते मध्य दोहाच्या अल बिड्डा पार्कमध्ये ४० हजार क्षमतेच्या फिफा फॅन फेस्टमध्ये त्यांची विक्री करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT