FIFA World Cup 2022 England Vs Iran esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 ENG vs IRN : इराणवर अर्धा डझन गोल करत इंग्लंडने वर्ल्डकपची केली धडाक्यात सुरूवात

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 England Vs Iran : फिफा वर्ल्डकप 2022 मधील ग्रुप B च्या सामन्यात बलाढ्य इंग्लंडने इराणचा 6 - 2 अशा मोठ्या गोलफरकाने पराभव केला. हॅरी केनच्या नेतृत्वातील इंंग्लंडला संभाव्य विजेत्यांमध्ये गणले जाते. इंग्लंडने कतारमधील वर्ल्डकपची धाडाकेबाज सुरूवात करून आपल्या लौकिकास साजेसा खेळ केला. इंग्लंडकडून बुकायो साकाने दोन गोल केले तर रहीम स्टेर्लिंग, ज्यूड बेलिंगहम, मार्कस रॅशफोर्ड आणि जॅक ग्रिलीशने प्रत्येकी 1 गोल केला. इराणकडून मेहदी तारेमीने 2 गोल केल्या.

इंग्लंड आणि इराण यांच्यातील सामन्यात इंग्लंडने पहिल्यापासूनच सामन्यावर पकत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी बॉल आपल्या नियंत्रणात ठेवत इराणच्या गोलपोस्टवर कायम दबाव निर्माण केला होता. दरम्यान, इराणचा गोलकिपर बैरानवांदच्या नाकाला दुखापत झाली. त्यामुळे दुसरा गोलकिपर मोसैनीला मैदानात पाचारण करण्यात आले.

यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला मात्र इंग्लंडने पुन्हा नियंत्रण मिळवत इराणच्या गोलपोस्टवर सातत्याने चाल केली. दरम्यान, इंग्लंडचे दोन प्रयत्न फसल्यानंतर 35 व्या मिनिटाला ज्यूड बेलिंगहमने हेडरद्वारे इंग्लंडचा पहिला गोल नोंदवला. त्यानंतर हाफ टाईमला काही मिनिटेच शिल्लक असताना बुकाओ साकाने डाव्या पायाने जोरदार फटका मारत 43 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. यानंतर हाफ टाईमनंतर इंज्यूरी टाईममध्ये कर्णधार हॅरी केनने रहीम स्टर्लिंगला एक जबरदस्त पास दिला. यावर स्टर्लिंगने कोणतीही चूक न करत गोल करत इराणवरील आघाडी 3 - 0 अशी नेली.

इंग्लंडने हाफटाईमपर्यंत 7 शॉट्स इराणच्या गोलपोस्टच्या दिशेने खेळले. त्यातील चार ऑन टार्गेट होते. त्यातील तीनवर गोल करण्यात यश आले. तर इराणने एकही शॉट इंग्लंडच्या गोलपोस्टवर मारला नाही. इंग्लंडने हाफटाईमपर्यंतच 407 पासेस दिले होते. तर इराणला 88 पास करण्यात यश आले.

हाफाटाईमनंतर इंग्लंडने आपला गोलचा धडाका कायम ठेवला. इंग्लंडचा फॉर्वर्ड प्लेयर बुकायो साकाने आपला वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा गोल केला. इंग्लंडने इराणवर चौथा गोल केल्यानंतर इराणने अवघ्या तीन मिनटात इंग्लंडला प्रत्युत्तर देत आपला सामन्यातील पहिला गोल नोंदवला. मेहदी तारेमीने घोलीजादेहच्या पासवर गोल करत संघाचे खाते उघडले.

इराण आपल्या पहिल्या गोलचा आनंद साजरा करत असतानाच इंग्लंडने इराणवर 71 व्या मिनटाला पाचवा गोल दागला. मार्कस रॅशफोर्डने हॅरी केनच्या पासवर इंग्लंडचा पाचवा गोल केला. इंग्लंडचा फुटबॉलर जॅक ग्रिलीशने 89 व्या मिनिटाला इराणवर गोल करत इंग्लंडची गोलसंख्या 6 वर नेली. अखेर मेहदीला पेनाल्टी किक मिळाली आणि इराणने सामना दुसरा गोल करत संपवला.

England Vs Iran HIGHLIGTS

पेनाल्टी किकवर इराणने केला दुसरा गोल; इंग्लंडने सामना 6 - 2 असा जिंकला.

89 : इंग्लंडने इराणवर केले अर्धा डझन गोल

इंग्लंडचा फुटबॉलर जॅक ग्रिलीशने 89 व्या मिनिटाला इराणवर गोल करत इंग्लंडची गोलसंख्या 6 वर नेली.

71 : इंग्लंडने इराणच्या आनंदावर लगेच फेरले पाणी

इराण आपल्या पहिल्या गोलचा आनंद साजरा करत असतानाच इंग्लंडने इराणवर 71 व्या मिनटाला पाचवा गोल दागला. मार्कस रॅशफोर्डने हॅरी केनच्या पासवर इंग्लंडचा पाचवा गोल केला.

65 : इराणने खाते उघडले 

इंग्लंडने इराणवर चौथा गोल दागल्यानंतर इराणने अवघ्या तीन मिनटात इंग्लंडला प्रत्युत्तर देत आपला सामन्यातील पहिला गोल नोंदवला. मेहदी तारेमीने घोलीजादेहच्या पासवर गोल करत संघाचे खाते उघडले.

62 : बुकायोचा दुसरा गोल, आघाडी 4 - 0

इंग्लंडचा फॉर्वर्ड प्लेयर बुकायो साकाने आपला वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथा गोल केला.

45 -1 : कर्णधाराचा पास अन स्टर्लिंगचा अचूक गोल (3-0)

हाफ टाईमला काही सेकंदच शिल्लक असताना इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने रहीम स्टर्लिंगला एक जबरदस्त पास दिला. यावर स्टर्लिंगने कोणतीही चूक न करत गोल करत इराणवरील आघाडी 3 - 0 अशी नेली.

43 : हाफ टाईमपूर्वीच इंग्लंडचा दुसरा गोल

हाफ टाईमला काही मिनिटेच शिल्लक असताना बुकयो साकाने डाव्या पायाने जोरदार फटका मारत 43 व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

35 : बेलिंगहमचा हेडर थेट इराणच्या गोलपोस्टमध्ये 

जसजसा हाफ टाईम जवळ येत होता. इंग्लंडने आपल्या आक्रमणाची धार वाढवली होती. मात्र त्यांच्या प्रयत्नांना 35 व्या मिनिटाला यश आले. ज्यूड बेलिंगहमने हेडरद्वारे इंग्लंडचा पहिला गोल नोंदवला.

इंग्लंडचे आक्रमण फसले

सामन्याच्या 29 व्या मिनिटाला इंग्लंडने इराणच्या गोलपोस्टवर चाल केली होती. मात्र बॉल गोलपोस्टच्या बाहेरच्या जाळीला लागला आणि ही चाल फसली. यानंतर 32 व्या मिनिटाला देखील त्यांना मिळालेला कॉर्नरचा फायदा उचलता आला नाही.

इराणच्या गोलकिपरला दुखापत

सामन्याच्या 11 व्या मिनिटाला इराणचा गोलकिपर बैरानवांदच्या नाकाला दुखापत झाली. त्यामुळे सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर मैदानातच उपचार करण्यात आले. तो उभा राहिला मात्र त्याला फारसे बरे वाटत नसल्याने दुसरा गोलकिपर मोसैनीला मैदानात पाचारण करण्यात आले.

इंग्लंडचे पहिल्या मिनिटापासून नियंत्रण 

बलाढ्य इंग्लंडने इराणविरूद्धच्या सामन्यात पहिल्या मिनिटापासूनच नियंत्रण ठेवले. त्यांनी बॉल सातत्याने इराणच्या गोलपोस्टजवळच ठेवला.

गेल्या वर्ल्डकपमधील गोल्डन बुटचा मानकरी हॅरी केन

गेल्या वर्ल्डकपमधील गोल्डन बुटचा मानकरी हॅरी केन यंदाच्या फिफा वर्ल्डकपमध्ये देखील धडाक्यात सुरूवात करण्याच्या तयारीत असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT