FIFA World Cup 2022 Qatar : यजमान कतारने फिफा वर्ल्डकप 2022 यशस्वी होण्यासाठी गेल्या 12 वर्षात पाण्यासारखा पैसा खर्च केला. मात्र आज त्यांचे नॉक आऊटचे स्वप्न धुळीस मिळाले. सेनेगलने कतारचा 3 - 1 असा पराभव केला. याचबरोबर कतार हा ग्रुप स्टेजमध्ये पहिले दोन सलग सामने गमावणारा पहिला यजमान संघ ठरला. आनंदाची बाब म्हणजे कतारने इतिहासातील आपल्या पहिल्याच वर्ल्डकपमध्ये पहिल्या गोलची नोंद केली. बदली खेळाडू म्हणून आलेल्या मोहम्मद मुनतारीने 78 व्या मिनिटाला हेडद्वारे गोल करत कतारकडून वर्ल्डकपमध्ये पहिला गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलपोस्टवर चढाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र 40 मिनिटापर्यंत कोणत्याही संघाला गोल करता आला नव्हता. अखेर सेनेगलच्या बौलाए डियाला 41 व्या मिनिटाला गोल करथण्याची संधी मिळाली. ती त्याने न दवडता कतारवर पहिला गोल डागला. दरम्यान, हाफ टाईमपर्यंत कतारला या गोलची परतफेड करता आली नाही.
यानंतर दुसऱ्या हाफमध्ये सुरूवातीच्या तीन मिनिटातच सेनेगलने करावर दुसरा गोल डागत आपली आघाडी 2 - 0 अशी वाढवली. हा दुसरा गोल फामाराने केला. दरम्यान, कतारने आपला खेळ उंचावत सेनेगलच्या गोलपोस्टवर आक्रमक चढाया करण्यास सुरूवात केली. मात्र त्यांना यश येत नव्हते. अखेर 78 व्या मिनिटाला बदली खेळाडू मोहम्मद मुनतारीने हेडरद्वारे कतारचा वर्ल्डकप इतिहासातील पहिला गोल केला.
यानंतर कतारने सेनेगलशी बरोबरी साधण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र 84 व्या मिनिटाला बामा डियांगने सेनेगलसाठी तिसरा गोल करत कतारचा पराभव निश्चित केला. कतारने आजच्या सामन्यात 10 शॉट्स खेळले त्यापैकी 3 शॉट्सच अचूक होते. सेनेगलने 13 वेळा कतारच्या गोलपोस्टवर चाल केली. त्यातील 5 शॉट्स हे अचूक ठरले. त्यातील तीन शॉट्सवर गोल झाले.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.