अल रय्यान (कतार) : सामन्यातील नऊ मिनिटे बाकी असताना केशर फुलर याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर कॉस्टारिकाने विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान कायम राखले. त्यांनी जपानला १-० फरकाने हरविल्यामुळे ई गटात आता चुरस वाढली आहे.
अहमद बिन अली स्टेडियमवर झालेल्या लढतीत फुलर याने ८१व्या मिनिटास गोल नोंदवून कॉस्टारिकाला आघाडी मिळवून दिली. गोलक्षेत्राच्या बाहेर त्याला सहकारी येल्तसिन तेदेडा याने चेंडू पास केला. कॉस्टारिकाच्या मध्यरक्षकाच्या डाव्या पायाचा फटका जपानचा गोलरक्षक शुईची गोन्दा याने अडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. चेंडू त्याच्या बोटांना चाटून गोलनेटमध्ये गेला. कॉस्टारिकाचा हा सामन्यात लक्ष्याच्या दिशेने पहिलाच प्रयत्न होता. दोन सामन्यांत मिळून कॉस्टारिकाने पहिल्यांदाच शॉट ऑन टार्गेट मारला व त्यात यश प्राप्त केले.
कॉस्टारिकाचा सुधारित खेळ
कॉस्टारिकाचा स्पेनने पहिल्या लढतीत ७-० असा धुव्वा उडविला होता. तुलनेत त्यांनी रविवारी सुधारित खेळ केला. त्यामुळे जपानची आक्रमणे यशस्वी ठरली नाहीत. उत्तरार्धात दोन वेळा जपानी संघाला गोलक्षेत्राबाहेरून फ्रीकिक फटका मिळाला; पण दोन्ही वेळेस फटक्यात भेदकता दिसली नाही. त्यामुळे पहिल्या लढतीत जर्मनीला २-१ फरकाने पराजित केलेल्या आशियाई संघाला यावेळी गोल नोंदविता आला नाही. जपानला सामन्यात पाच कॉर्नर्स मिळाले, तुलनेत कॉस्टारिकाला एकही कॉर्नर मिळाला नाही.
बाद फेरीसाठी चुरस
कॉस्टारिका व जपानचे आता प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर समान तीन गुण झाले आहेत. दोन्ही संघांना ई गटातून बाद फेरीची संधी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.