अबुधाबी : लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना फुटबॉल संघाची कतारमधील फिफा विश्वकरंडकाची सुरुवात दमदार झाली आहे. अर्जेंटिनाने सराव लढतीत संयुक्त अरब अमिरातीचा ५-० असा धुव्वा उडवला आणि मुख्य फेरीच्या लढतींआधी आत्मविश्वास कमवला. या लढतीत मेस्सीच्या खेळाकडेच सर्वांचे लक्ष होते. ज्युलियन अल्वारेझ याने १७व्या मिनिटाला गोल केला. या गोलमध्ये मेस्सीचे सहकार्य लाभले. त्यानंतर एंजेल दी मारीया याने २५व्या व ३६व्या मिनिटाला गोल करीत अर्जेंटिनाला ३-० असे पुढे नेले. पूर्वार्धाच्या एक मिनीट आधी मेस्सीने स्वत:चा पहिला गोल केला.
त्यामुळे अर्जेंटिनाकडे पूर्वार्धातच ४-० अशी आघाडी होती. इंटर मिलानचा फॉरवर्ड खेळाडू जोकीन कोरिया याने ६०व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी पाचवा व अखेरचा गोल केला. अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनी हाफ टाईमनंतर संघात चार बदल केले; पण मेस्सीला त्यांनी विश्रांती दिली नाही. तो ९० मिनिटे मैदानावर होता, हे विशेष.
निकलसमुळे जर्मनी वाचली
चार वेळा विश्वविजेता ठरलेल्या जर्मनीने सराव लढतीत ओमानवर १-० असा विजय संपादन केला. जर्मनीला या लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. निकलस फुल्करग या पहिला सामना खेळणाऱ्या खेळाडूने एकमेव गोल केला. त्याने ८०व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे संघाला ओमानवर विजय मिळवता आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.