फुटबॉल sakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : अंतिम चार सामन्यांसाठी नवे 'फुटबॉल'

आता ‘स्वप्नाचे सौदागर’

सकाळ वृत्तसेवा

कतार : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत आता सर्वांत महत्त्वाच्या अंतिम सामन्यासह मोजक्या चार लढती शिल्लक आहेत आणि त्याकरिता स्पर्धेसाठी चेंडू तयार करणाऱ्या आदिदास या कंपनीने नवे फुटबॉल तयार केले आहेत. आतापर्यंतच्या सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या चेंडूंना ‘यशस्वी प्रवास’ (अल रिह्ला) असे नाव देण्यात आले होते; मात्र आता पुढच्या लढतींसाठी ‘स्वप्नांचे सौदगर’ (अल हिलम) असे नाव देण्यात आले आहे.

नवे नामकरण करण्यात येणारे आणि नव्याने तयार करण्यात आलेले हे चेंडू मंगळवारी होणाऱ्या अर्जेंटिना-क्रोएशिया आणि बुधवारी होणाऱ्या गतविजेत्या फ्रान्स-मोरोक्को उपांत्य सामन्यात खेळवण्यात येतील. त्यानंतर शनिवारच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीनंतर रविवारच्या अंतिम सामन्यात हे चेंडूही आकर्षण ठरतील. स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्व सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या चेंडूंमध्ये जे तंत्रज्ञान होते तेच तंत्रज्ञान नव्या चेंडूतही असणार आहे. या चेंडूमध्ये सेन्सर असलेली चिप आहे. त्यातून मिळणाऱ्या माहितीचा फायदा रेफ्रींना ऑफसाईड आणि इतर महत्त्वाचे निर्णय देताना होत आहे, असे फिफाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT