क्रीडा

Lionel Messi FIFA WC22: पीएसजी आणि मेस्सीचा योग जुळणार?

यंदाच्या स्पर्धेत मेस्सीची स्वप्नपूर्ती होईल का, याकडे सर्वांच्या नजरा

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई, ता. १६ ः ऑलिंपिक, कोपा अमेरिका, चॅम्पियन्स लीग व इतर लीग या सर्व स्पर्धांच्या जेतेपदावर मोहोर उमटवलेल्या संघाचा सदस्य असलेल्या लिओनेल मेस्सी याला अर्जेंटिनासाठी विश्‍वकरंडक जिंकता आलेला नाही. कतारमधील विश्‍वकरंडकाचा अंतिम सामना हा त्याचा या स्पर्धेतील अखेरचा सामना असणार आहे.

यंदाच्या स्पर्धेत मेस्सीची स्वप्नपूर्ती होईल का, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) या क्लबसोबतचा त्याचा करार या वेळी त्याला तारण्याची शक्यता आहे. पीएसजी व विश्‍वकरंडक याचा थेट संबंध नसला, तरी इतिहासावर नजर टाकल्यास या क्लबशी जोडल्या गेलेल्या खेळाडूंनी पुढे जाऊन विश्‍वकरंडक जिंकलेला आहे. याच कारणामुळे मेस्सीसाठीही ही आनंददायी बातमी ठरू शकते.

पीएसजी मेस्सीसाठी फलदायी?

रोनाल्डिन्हो व एम्बाप्पे या दोघांप्रमाणे मेस्सीसाठी हा योगायोग हितकारक ठरतो का, हे पाहायला नक्कीच आवडणार आहे. कारण वर्षानुवर्षे बार्सिलोना क्लबसाठी खेळणाऱ्या मेस्सीने २०२१ मध्ये बार्सिलोना सोडून पीएसजी क्लबसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर एक वर्षानंतर विश्‍वकरंडक सुरू आहे.

काय आहे योगायोग

आशिया खंडामध्ये २००२ मध्ये विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा ब्राझीलने जिंकली. ब्राझीलच्या विश्‍वविजेत्या संघामध्ये रोनाल्डिन्हो होता. याच रोनाल्डिन्होला पीएसजी क्लबकडून २००१ मध्ये करारबद्ध करण्यात आले होते. त्याला करारबद्ध करण्यात आल्यानंतर एक वर्षांनंतर ब्राझीलने विश्‍वकरंडक जिंकला.

फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पे यालादेखील २०१७ मध्ये पीएसजीकडून करारबद्ध करण्यात आले. त्याआधी तो मोनॅको क्लबशी करारबद्ध होता. मात्र २०१७ मध्ये त्याला करारबद्ध करण्यात आल्यानंतर फ्रान्सने २०१८ मध्ये विश्‍वकरंडक जिंकण्याची किमया करून दाखवली. बरोबर एक वर्षानंतर हा करिष्मा झाला. विशेष म्हणजे रोनाल्डिन्हो व एम्बाप्पे या दोन्ही खेळाडूंनी विश्‍वविजेत्या संघात जबरदस्त कामगिरी करून आपली चमक दाखवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT