FIFA World Cup Metro Man : कतारमध्ये होत असलेल्या फिफा वर्ल्डकप 2022 ची बाद फेरी सध्या सुरू आहे. यंदाचा वर्ल्डकप हा दोन स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा अखेरचा वर्ल्डकप असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांनी पाहण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी जगभरातील चाहते कतारकडे कूच करत आहेत. दरम्यान, कतारमध्ये पोहचलेल्या चाहत्यांचे एका व्यक्तीने लक्ष वेधले. आता कतारमधील प्रत्येक फुटबॉलप्रेमी या व्यक्तीचा फॅन झाला आहे. त्याला लोक प्रेमाणे मेट्रो मॅन म्हणून देखील संबोधत आहेत.
कतारमधील एका खुर्चीवर बसून मेट्रो कोणत्या दिशेला आहे याची माहिती देणारा एक व्यक्ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो स्टेडियम बाहेरील फुटबॉल चाहत्यांना मेट्रो स्टेशन कोणत्या दिशेला आहे हे सांगतो. मात्र त्याची सांगण्याची पद्धत इतकी विनोदी आणि आकर्षक आहे की तो अल्पावधितच प्रसिद्ध झाला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा कतारमधील मेट्रोमॅन इतका प्रसिद्ध झाला की, त्याला इंग्लंड आणि अमेरिका यांच्यातील सामन्यात विशेष पाहुणा म्हणून स्टेडियममध्ये आमंत्रित करण्यात आले. फुटबॉल चाहते त्याच्याबद्दलचा अनुभव सांगताना म्हणतात की तो खूप विनंम्रपणे माहिती देतो. आदराने वागवतो आणि खूप प्रेमळ आहे. अनेक चाहते फक्त त्याला पाहण्यासाठी स्टेडियमकडे येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या मेट्रोमॅनचे नाव अबुबकर अब्बास असे आहे. हा 23 वर्षाचा युवाक केनियाचा असून कतारमध्ये येण्यापूर्वी त्याने सुरक्षा विभागात काम करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र कतारमध्ये आल्यावर त्याला दररोज लोकांना दिशा सांगण्याचे काम सोपवण्यात आले. हे काम देखील त्याने मन लावून आणि इतक्या रंजकपणे केले की तो संपूर्ण जगात मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध झाला.
हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.