FIFA World Cup Qatar : यंदाचा फिफा वर्ल्डकप 2022 हा कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दरम्यान, कतारचे शासक शेख तमिम बिन हमाद अल - थानी यांनी आज एक खळबळजनक वक्तव्य केले. त्यांनी आपल्या भाषणात 'जेव्हापासून आम्ही फिफा वर्ल्डकपचे आयोजकपद मिळवले आहे तेव्हापासून कतारविरूद्ध टीका करणारी कमालीची मोहिम राबवण्यात आली. अशी मोहिम इतर आयोजक देशांनी कधीही पाहिली नसेल.'
फिफाने कतारला 2010 मध्ये 2022 चा वर्ल्डकप आयोजित करण्याचा मान दिला होता. तेव्हापासून कतारने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तयारीवर 10 बिलियन डॉलर्स खर्च केले आहेत. आखातातील कतावर कायम टीका करण्यात येत आहे. कधी विदेशी कामगारांना देण्यात येणारी वागणूक तर कधी समलैंगिक आणि महिलांच्या अधिकारांवरून कतार कायम टीकेच्या भोवऱ्यात अडकत राहिला.
याबाबत कतारचे शासक कतारच्या संसदीय सदस्यांसमोर बोलताना म्हणाले की, 'सुरूवातीला आमच्यावर होणारी टीका आम्ही चांगल्या भावनेने हाताळला. अनेक सकारात्मक दृष्टीकोणातून होणाऱ्या टीकेची देखल घेऊन बदल देखील केले. याची आम्हाला आमचा विकास करण्यासाठी मदत देखील झाली. मात्र काही काळातच आम्हाला कळून चुकले की ही कतारविरूद्ध राबवण्यात येणारी मोहिम आहे. ही मोहिम दिवसेंदिवस तीव्र होत गेली. यात चुकीच्या गोष्टींचा आणि दुटप्पीपणाचा समावेश होता. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले.' कतारच्या प्रशासकांनी कतारची बदनामी करण्याची मोहिम राबवण्यात आल्याचा आरोप केला.
शेख तमिम बिन हमाद अल - थानी पुढे म्हणाले की, हा वर्ल्डकप जगाला आपण कोण आहोत. आपली बलस्थानं, आपली अर्थव्यवस्था आपल्या संस्था कशा आहेत हे दाखवण्याची चांगली संधी आहे. याचबरोबर आमची समाज म्हणून काय ओळख आहे हे देखील जगासमोर ठेवण्याची चांगली संधी आहे.' याचबरोबर ते म्हणाले की, 'ही आपल्या देशासाठी एक मोठी परीक्षा असणार आहे.'
दरम्यान, फिफाचे अध्यक्ष जिआनी इनफान्टिनो हे म्हणाले होते की कतारमध्ये होणारा वर्ल्डकप हा अरब देशात होणारा पहिला वर्ल्डकप आहे. हा वर्ल्डकप आतारपर्यंतचा सर्वात चांगला वर्ल्डकप होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.