India vs West Indies sakal
क्रीडा

India vs West Indies : भारत-विंडीज मालिकेतील आज अखेरचा सामना; रोहित-विराटला खेळविण्याची शक्यता

प्रयोगाला पसंती की अस्तित्वाला प्राधान्य?

सकाळ वृत्तसेवा

त्रिनिनाद : प्रयोगशीलतेपेक्षा ज्यांच्यावर विश्वास दाखवला त्या सर्वांनी निराशा केल्यामुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना गमावला. आता त्यात सुधारणा केली नाही तर, मालिका गमावण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली उद्याच्या सामन्यात खेळणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा तोंडावर येत आहे, त्यापूर्वी भारतीय संघाचे केवळ १० सामने शिल्लक आहेत, अशा वेळी जो संघ विश्वकरंडक स्पर्धेस पात्र ठरलेला नाही त्या विंडीजविरुद्ध मालिका गमावण्याची परिस्थिती भारतीय संघातील बेजबाबदार फलंदाजीमुळे ओढावली आहे. उद्या यात सुधारणा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

उद्याच्या या एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय संघ विंडीजविरुद्ध पाच ‘ट्वेन्टी-२०’ सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड करण्यात आलेली नाही.

या मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर ‘टी-२०’ मालिका खेळणार आहे. त्याततही रोहित-विराटचा समावेश नाही. म्हणजे येथून पुढे ते आशिया करंडक स्पर्धेत खेळतील. या पार्श्वभूमीवर उद्याच्या सामन्यात त्यांना खेळवण्याबाबतचा प्रश्न संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागणार आहे.

विंडीजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारतीय फलंदाजी कोलमडली. पहिल्या सामन्यात ११४ धावा करताना पाच विकेट गमावले तरी त्यातून बोध घेतला नाही. दुसऱ्या सामन्यात पूर्ण ५० षटके फलंदाजीही करता आली नव्हती. अवघ्या १८१ धावांत सर्व संघ बाद झाला होता.

सर्वांना संधी देण्याचे प्रयोग सुरू राहाणार, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सांगत असले तरी मालिकेतील अस्तित्व पणास लावून धोका पत्करणे मुळावर येऊ शकेल. इशान किशनचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाज अपेक्षाभंग करत आहेत. या सर्वांना आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे.

कपिल देव, सुनील गावसकर यांसारख्या माजी महान खेळाडूंनी भारतीय संघातील खेळाडूंच्या दृष्टिकोनावर जोरदार टीका केली आहे. या खेळाडूंना हरले काय, जिंकलो काय, पैशांपुढे काही फरक पडत नाही, असे कडक ताशेरे मारले आहेत. पण त्यातून सुधारणा होणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

बार्बार्डोसच्या फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजी लडखडली. दुसऱ्या सामन्यात कशाबशा १८१ धावा केल्या, पण हेच आव्हान विंडीजने चार फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. यावरून खेळपट्टी फलंदाजीस कठीण नव्हती, हे सिद्ध झाले.

या दुसऱ्या सामन्यात इशान किशन आणि शुभमन गिल यांनी ९० धावांची सलामी दिली होती, त्यानंतर पुढच्या ९१ धावांत १० फलंदाज गमावले होते. या सामन्यात नेतृत्व करत असलेला हार्दिक पंड्याचे अपयश कायम राहिले आहे.

सूर्यकुमारसाठी अखेरची संधी?

सूर्यकुमार यादव हाती असलेली एकेक संधी वाया घालवत आहे. टी-२० प्रमाणे तो आक्रमक सुरुवात करतो, पण २० ते २५ धावांच्या पुढे त्याची मजल जात नाही. द्रविड यांनी चांगल्या शब्दांत सूर्यकुमारला इशारा दिला आहे.

आता नाही तर कधीच नाही, अशी परिस्थिती त्याच्यासमोर उभी राहिली आहे. येत्या काही दिवसांत आशिया करंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर केला जाईल. त्यात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर परतले तर सूर्यकुमारला वगळण्याशिवाय पर्याय रहाणार नाही. उद्याच्या सामन्यात अंतिम ११ खेळाडूंत सूर्यकुमार संघात असेल की नाही, हे सांगणेही कठीण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT