csks south africa league team esakal
क्रीडा

CSKS| फ्लेमिंग कोच तर डुप्लेसिस कॅप्टन; नावासह लोगोही केला जाहीर

चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडच्या जोहान्सबर्ग फ्रँचायझीला दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये 'जोबर्ग सुपर किंग्स' असे नाव देण्यात आले आहे

धनश्री ओतारी

चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडच्या जोहान्सबर्ग फ्रँचायझीला दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये 'जोबर्ग सुपर किंग्स' असे नाव देण्यात आले आहे.

चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा जुना खेळाडू फाफ डू प्लेसिसवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सीएसकेने डु प्लेसिसला दक्षिण आफ्रिकेच्या T20 लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्स संघाचा कर्णधार बनवले आहे. (finally csks south africa league team name reveals logo is too released)

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डू प्लेसिसचा फ्रँचायझीने थेट करार करून संघात समावेश केला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आता जोहान्सबर्ग सुपर किंग्जच्याही प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहेत.

एका प्रसिद्धीपत्रकानुसार, सीएसकेसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन, दक्षिण आफ्रिका 20 लीगचे आयुक्त ग्रॅमी स्मिथ, जॉबर्ग सुपर किंग्जचा कर्णधार डू प्लेसिस, मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंग आणि जोनो लीफ राइट यांच्यात झालेल्या संवाद सत्रादरम्यान ही घोषणा करण्यात आली.

जोहान्सबर्ग फ्रँचायझीमध्ये श्रीलंकेचा ऑफस्पिनर महिश तीक्षणा, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रोमारियो शेफर्ड आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोटजे यांचाही समावेश आहे. या खेळाडूंव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्जच्या अनेक जुन्या खेळाडूंची कोचिंग स्टाफमध्ये निवड करण्यात आली आहे. स्टीफन फ्लेमिंग हे मुख्य प्रशिक्षक असतील. त्याचबरोबर एरिक सिमन्सला सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

सीएसकेसीएलकडून 'लोगो'चे अनावरणही करण्यात आले. जोबर्ग सुपर किंग्जचा कर्णधार डु प्लेसिसने लीगबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या लीगमध्ये सीएसके व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद व लखनऊ सुपरजायंट्स या फ्रॅचायजींनीही संघ विकत घेतले आहेत. तर चेन्नईने जोहान्सबर्ग फ्रॅचायजींला सर्वोच्च बोली लावत विकत घेतले.

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या टी२० लीगमध्ये निम्म्यापेक्षा सर्वाधिक संघ इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रॅंचायजींनी विकत घेतले आहेत. यामुळे या लीगला मिनी आयपीएल देखील म्हटले जात आहे.

सहा फ्रँचायझींना ३० खेळाडूंच्या यादीतून प्रत्येकी पाच खेळाडू निवडण्याचा अधिकार देण्यात आला होता. यामध्ये जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोनसारख्या खेळाडूंचा समावेश होता. एका संघात १७ खेळाडू असू शकतात. पाच खेळाडूंव्यतिरिक्त उर्वरित १२ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी २० सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

Warora Assembly Election Result 2024 : वरोरामध्ये गुलाल भाजपचाच! करण देवतळे 65170 मतांनी विजयी

Kalyan Rural Election Result 2024 : कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 396 मतांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT