Fire Broke in Karachi National Stadium commentary box burned  esakal
क्रीडा

Video: पाकिस्तानच्या नॅशनल स्टेडियमचा कॉमेंटरी बॉक्स जळून खाक

अनिरुद्ध संकपाळ

पाकिस्तानमधील क्रिकेट आताकुठे रूळावर येत होते. तोच कराचीमधील नॅशनल स्टेडियममध्ये (Karachi National Stadium) आग लागण्याची घटना २५ जानेवारीच्या रात्री घडली. आग इतकी मोठी होती की स्टेडियमच्या बाहेरून या आगीचा धूर स्पष्टपणे दिसत होता. या आगीत स्टेडियममधील कॉमेंटरी बॉक्स जळून खाक झाला. (Fire Broke in Karachi National Stadium commentary box burned)

पाकिस्तानच्या कराची नॅशनल स्टेडियममध्ये (Karachi National Stadium) २७ जानेवारीपासून पाकिस्तान सुपर लीगची (PSL 2022) सुरूवात होणार आहे. याच मैदानावर कराची किंग्ज आणि मुलतान सुलतान (Karachi Kings vs Multan Sultans) यांच्यातील पहिला सामना होणार आहे. दरम्यान, २५ जानेवारीला स्टेडियमवर आग लागल्याची घटना घडली. पाकिस्तानातील सोशल मीडियावर या आगीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक वायरींमुळे ही आग लागली. या आगीत मैदानात तयार करण्यात आलेला कॉमेंटरी बॉक्स देखील जळून खाक झाला. पाकिस्तान सुपर लीगसाठी हा कॉमेंटरी बॉक्स तयार केला होता. एका पाकिस्तानी न्यूज चायनलने दिलेल्या वृत्तानुसार वेल्डिंग मशिनमुळे ही आग लागली. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले.

अजून पर्यंत या घटनेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (Pakistan Cricket Board) कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र पाकिस्तान क्रिकेट ज्या स्थितीतून जात आहे ते पाहता या छोट्या घटनेचीही मोठी चर्चा होईल यात शंका नाही. २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा दौरा करणार आहे. जर या आगीचे कारण वेल्डिंग मशिनच असले तर ठीक आहे. जर या आगीचा सुरक्षिततेबाबत काही संबंध असेल तर मग पाकिस्तान क्रिकेटसाठी ही खूप वाईट घटना असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT