IPL Lucknow Super Giants : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आपल्या पदार्पणासाठी लखनऊचा सुपर जायंट्स संघ उत्सुक आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात मजबूत संघ बांधणी केल्यानंतर संघाने दमदार कामगिरी करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. लखनऊ सुपर जायंट्स संघाने आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खास बॅट भेट दिली आहे. विशेष म्हणजे लखनऊ फ्रँचायझीची ही पहिली बॅट आहे. ही भेटवस्तू उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खूपच भावली आहे. त्यांनी आनंदाने या भेट वस्तूचा स्विकार केला.
लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका आणि संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर ही जोडगोळी खास भेट घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले. लखनऊच्या संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या ग्रेट भेटीचे फोटो शेअर केले आहेत.. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'लखनऊ सुपर जायंट्सची पहिली बॅट माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर सादर करण्यात आली. त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
आयपीएलच्या या हंगामात दोन नवीन संघ सामील होत आहेत. लखनऊ सुपर जायंट्सचा संघ यापैकी एक आहे. प्रसिद्ध उद्योगपती संजीव गोयंका यांनी लखनऊ फ्रँचायझी 7090 कोटी रुपयांना विकत घेतली. लखनऊच्या संघाचे प्रशिक्षक झिम्बाब्वेचे माजी दिग्गज अँडी फ्लॉवर आहेत, तर गौतम गंभीरला या संघाचा मार्गदर्शक बनवण्यात आले आहे. संघाचा कर्णधार केएल राहुल आहे.
लखनऊ संघ :
केएल राहुल, मार्कस स्टॉयनिस, रवि बिश्नोई, क्विंटन डिकॉक, मनीष पांडे, जेसन होल्डर, क्रुणाल पांड्या, दीपक हूडा, मार्क वुड, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुशमांथा चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, आयुष बदोनी, काइल मेयर्स, करन शर्मा, एविन लुईस, मयंक यादव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.