England Defeat Fighter Pakistan In T20 World Cup 2022 Final : टी 20 वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानला 137 धावात रोखले. इथेच इंग्लंड सामना जिंकला अशी धारणा सर्वांची झाली. मात्र पाकिस्तानने झुंजारवृत्ती दाखवून इंग्लंडला एका एका धावेसाठी प्रचंड घाम गाळायला लावला. मात्र अखेर इंग्लंडने आपले सामन्यावरील नियंत्रण पुन्हा मिळवले आणि 2022 च्या टी 20 वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. कोणत्या कारणांमुळे इंग्लंड पाकिस्तानचा कडवा प्रतिकार मोडून काढू शकला याचा आढावा घेणे देखील गरजेचे आहे.
राशिद खान सॅम करनने पाडले पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार
मेलबर्नमध्ये गेल्या दोन दिवसापासून पाऊस पडत होता. मात्र बरोबर सामन्याच्यावेळी वरूणराजा इंग्लंड आणि पाकिस्तानवर प्रसन्न झाला. मात्र विकेट दोन दिवस कव्हरमध्ये असल्याने नाणेफेक जिंकून जॉस बटरलने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत ठराविक अंतराने पाकिस्तानच्या विकेट्स घेत भागीदारी रचण्यापासून रोखले. विशेष म्हणजे इंग्लंडच्या वेगवान तसेच फिरकीपटूंनी देखील पाकिस्तानी फलंदाजांची शिकार करण्यात अग्रेसर राहिले. इंग्लंडकडून आदिल राशिदने दोन विकेट घेतल्या. त्यातील सर्वात महत्वाची विकेट म्हणजे बाबर आझमची विकेट राशिदने घेतली. त्यांनतर सॅम करनने पाकिस्तानच्या मधल्या फळीला खिंडार पाडले. त्याने अवघ्या 12 धावात 3 बळी टिपले.
जॉस बटलरची दर्जेदार कॅप्टन्सी
जॉस बटलरने पॉवर प्लेमध्ये आपल्या तीन गोलंदाजांचा वापर केला. या पॉवर प्लेमध्येच इंग्लंडने पाकिस्तानची एक विकेट्स घेतल्या. ही विकेट मोहम्मद रिझवानची महत्वाची होती. त्यानंतर बटलरने कर्णधार बाबरसाठी आदिल राशिदला पॉवर प्ले संपल्या संपल्या गोंदाजीला आणले. बाबार हा राशिदची हक्काची शिकार आहे. राशिदनेही कर्णधाराला निराश न करत बाबरला 32 धावांवर बाद करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला.
मेलबर्न हे मोठे ग्राऊंड असल्याने या विकेटवर चांगले व्हेरिएशन असलेला गोलंदाज विकेट्स काढून देतो. हे बटरला माहिती होतं त्याने वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणाऱ्या सॅम करनची दोन षटके पाकिस्तानच्या मधल्या फळीवर दबाव आणण्यासाठी वापरले. याचबरोबर योग्य ठिकाणी योग्य फिल्डरही बटरलने प्लेस केले.
बटलरच्या पायावर स्टोक्सने चढवला कळस
पाकिस्तानला 137 धावात रोखले असले तरी बटलर आणि त्यांच्या संघाला पाकिस्तानच्या गोलंदाजीत काय क्षमता आहे हे माहिती होतं. त्यामुळे बटलरने पॉवर प्लेमध्येच 50 धावा करण्याचे लक्ष्य ठेवले. याप्रमाणे त्याने काही विकेट्स पडूनही आक्रमक फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली.
या चांगल्या सुरूवातीचा फायदा नंतर बेन स्टोक्सने उठवला. त्याने मधल्या षटकात जास्त जोखीम न घेता धावफलक हलता ठेवण्यावर भर दिला. त्यानंतर शेवटच्या 5 षटकात त्याने गिअर बदलला. त्याच्या भोवती फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत धावगती वाढवण्यावर भर दिला. या रणनितीमुळे चांगली बॅटिंग डेप्थ असलेल्या इंग्लंडने पाकिस्तानचे 138 धावांचे आव्हान 19 व्या षटकात पार केले.
तगडा संघ उभारण्यात इंग्लंडला आले यश
ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच इंग्लंडचा संघ संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात होता. इंग्लंडने आपल्या संघाची बांधणी करतानाच कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गोलंदाजी, फलंदाजीत दर्जेदार खेळाडूंची कमतरता भासणार नाही याची तजवीज केली होती. इंग्लंची बॅटिंग डेप्थ बघायची झाली तर त्यांची फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत आहे. गरज पडली तर ख्रिस वोक्स आणि जॉर्डन देखील फलंदाजीत आपले योगदान देऊ शकतो.
तसेच इंग्लंडकडे अष्टपैलूंमध्ये तीन ते चार चांगले पर्याय आहेत. यात बेन स्टोक्स, सॅम करन, मोईन अली, लिम लिव्हिंगस्टोन गरज पडलीच तर ख्रिस वोक्स आहेच. गोलंदाजीतही बटरलकडे 20 षटके टाकण्यासाठी 7 बॉलिंग ऑप्शन आहेत. त्यामुळे इंग्लंडला दुखापतींचा फटका बसून देखील त्यांच्या संघाच्या कॉम्बिनेशनमध्ये काही घोटाळा झाल्याचे दिसले नाही.
पाकिस्तानची दबावात फिल्डिंग झाला खराब
पाकिस्तानने 137 धावा झाल्या तरी झुंजारपणा दाखवत इंग्लंडला एका एका धावेसाठी कष्ट करायाला लावले. मात्र ज्यावेळी इंग्लंडचे फलंदाज भागीदारी रचत होते त्यावेळी पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी ढिसाळ क्षेत्ररक्षण करत इंग्लंडला आयती संधी दिली. जर पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी योग्य दिशेला आणि अचूक थ्रो केले असते तर सामन्याचे चित्र काही वेगळे असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.