Kolhapur Sports Association KSA Football Tournament esakal
क्रीडा

मैदानावर Mobile आणल्यास Football खेळाडूंना भरावा लागणार 'इतका' दंड; गैरवर्तन टाळण्यासाठी KSA कडून खबरदारी

वारंवार सूचना देऊनही मोबाईल आणण्याचा प्रकार यापूर्वी घडल्याने तसा निर्णय घेण्यात आला आहे.

संदीप खांडेकर

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएकडून मोबाईल बंदीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते.

कोल्हापूर : यंदाच्या फुटबॉल (Football) हंगामापासून संघातील खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांनी थेट मैदानावर मोबाईल आणल्यास त्यांना तीन हजार रुपये आर्थिक दंड (Mobile Ban) ठोठावला जाणार आहे. वारंवार सूचना देऊनही मोबाईल आणण्याचा प्रकार यापूर्वी घडल्याने तसा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशन (Kolhapur Sports Association KSA) व संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याने त्याची धास्ती खेळाडूंनी घेतली आहे. ‘केएसए’तर्फे यंदा शाहू छत्रपती केएसए चषक साखळी फुटबॉल स्पर्धेने हंगामाचा नारळ फुटला आहे. खेळाडू, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक यांच्यासह संघाच्या पाठीराख्यांकडून गैरवर्तन घडू नये, यासाठी केएसएने नियमांची काटेकोर चौकट तयार केली आहे.

त्याला आर्थिक दंडाची जोड दिली असून, हंगाम निर्विघ्नपणे पार पडावा‌ यावर लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः ज्या संघाचा सामना आहे, त्या संघातील खेळाडूंनी शिस्तीचे पालन करावे, यावर नेमकेपणाने बोट ठेवण्यात आले असून, त्यांना मैदानात मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव केला आहे. ड्रेसिंग रूमपर्यंत ते मोबाईल घेऊन जाऊ शकतात. मैदानावर मात्र त्यांना मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेता येणार नाहीत. तसा नियम नियमावलीत दहाव्या क्रमांकावर ठळकपणे अधोरेखित केला आहे.

गतवर्षीच्या सामन्यात काही खेळाडू मोबाईल घेऊन थेट मैदानावर आल्याची चर्चा झाली होती. वारंवार सूचना देऊनही ही चूक पुन्हा होऊ नये, याकरिता सतर्कतेने हा नियम तयार करण्यात आला आहे. काही सामन्यांत पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत मोबाईलवरील रेकॉर्डिंग, फोटोसह क्लिप प्रसारित केली जाते. ते पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना केएसएने आठव्या क्रमांकाच्या नियमात केली आहे. तसेच पंचांचा निर्णय अंतिम राहील, असा स्पष्ट संकेत पुन्हा दिला आहे.

खेळाडूची चौकशी

बीजीएम स्पोर्टस्‌ विरुद्ध सोल्जर्स ग्रुपच्या सामन्यात एका खेळाडूने मैदानावर मोबाईल आणल्याची चर्चा होती. सामना निरीक्षकांनी त्याची सखोल चौकशी केली असता, संबंधित मोबाईलधारक एका चॅनेलचा प्रतिनिधी असल्याची बाब समोर आली.

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएकडून मोबाईल बंदीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. केएसएने या नियमाला आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. या नियमाचे काटेकोरपणे पालन होणे आवश्‍यक आहे. तरच संघातील खेळाडू, संघ व्यवस्थापनाला शिस्त कळेल.

-श्रीनिवास जाधव, ज्येष्ठ फुटबॉलपटू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT