Fifa World Cup Sakal
क्रीडा

Fifa World Cup : फिफात कोण जिंकणार? प्राणी सांगतायत, फिफाचं भविष्य

फिफा विश्वचषकामध्ये भविष्य सांगणाऱ्या प्राण्यांची चलती आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रशांत केणी

फिफाचा फीव्हर जगभरातल्या क्रीडारसिकांवर आहे. वेगवेगळ्या टीम्स, खेळाडू यांचे फॅन फोलोइंग आहेच पण भविष्य सांगणाऱ्या प्राण्यांनाही एक वेगळेच फॅन फोलोइंग आहे. हे प्राणी फुटबॉल विश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झाले आहेत.

sijtje cow

सित्जे गाय

नेदरलँड्सची टीम कोस्टा रिकाचा पराभव करणार हे भविष्य सांगणारी गाय म्हणजे सित्जे गाय. राष्ट्रध्वज लावलेल्या दोन प्लास्टिकच्या भांड्यांपैकी एकातील खाद्य ती खाते आणि तोच सामन्याचा निकाल

नेली हत्तीण

जर्मनीच्या सेरेनगेटी पार्कमधील नेली हत्तीण ही आपल्या फुटबॉल कौशल्यानं सामन्याचं भाकित माडते. राष्ट्रध्वज असलेल्या दोन गोल पोस्टपैकी एकात नेली चेंडू मारते आणि गोल करते.

shahin camel

शाहीन उंटीण

दुबईतील शाहीन ही उंटीणसुद्धा निष्णात भविष्यवेत्ती मानली जाते. ‘गल्फ न्यूज’नं तिच्यावर आधारित एक व्हिडीओ मालिकासुद्धा तयार केली होती. राष्ट्रध्वज असलेले दोन फलक शाहीनपुढे ठेवल्यास ती यापैकी एकाची निवड करते आणि तिने ज्याची निवड केली तो संघ विजेता होतो.

ओशान पेंग्विन

जपानची राजधानी टोकियोमध्ये ओशान हा पेंग्विन पक्षीसुद्धा निकालक्षमतेसाठी ओळखला जायचा. एका गोल चकतीवर रेखाटलेल्या विविध निकालांपैकी एक निकाल तो चोचीनं निवडत असे.

कॅबेकाओ कासव

ब्राझिलमधील प्राया डू फोर्टे येथील कॅबेकाओ या कासवाची भाकितंसुद्धा खरी ठरली आहेत. ब्राझिलनं सलामीच्या सामन्यात बलाढ्य क्रोएशियाला हरवलं, हे कॅबेकाओनं आधीच सांगितलं होतं. राष्ट्रध्वज लावलेल्या दोनपैकी एक मासा फस्त करून कॅबेकाओने आपला कौल दिला होता.

आणखीही भविष्यवेत्ते - वाघापासून माशापर्यंत

  • जपानमध्येच आर्चरफिश हे मासेसुद्धा टँकमधील दोनपैकी एका राष्ट्रध्वज असलेली खाद्याची वाटी संपवून भाकितं मांडायचे.

  • जपानमधील हिमेजी सेंट्रल पार्कमधील चिप्पू ही पाणमांजरसुद्धा चर्चेत आली होती.

  • जर्मनीच्या म्युएन्स्टर शहरातील एका प्राणी संग्रहालयात नॉर्मन हा खवले असणारा एक प्राणीसुद्धा राष्ट्रध्वज चिकटवलेल्या दोनपैकी एक फुटबॉलची निवड करून भाष्य करतो.

  • रशियातील रोयेव रुचे प्राणी संग्रहालयातील खान नावाचा बंगाली पांढरा वाघसुद्धा नॉर्मनच्याच प्रणालीप्रमाणे भविष्यवाणी करतो.

  • चीनमधील जियाग्सू भागातील यिंग मेई हा पांडा समोरील तीन बॉक्सपैकी एकाची निवड करीत आपलं मतप्रदर्शन करतो.

  • स्वित्झर्लंडचा मॅडामी शिवा हे डुक्करसुद्धा छोट्या मैदानावरील दोन राष्ट्रध्वजांच्या रंगांवर आधारित निर्णय देत असे.

  • गतविश्वचषकाप्रसंगी आशिलीज ही रशियन मांजरसुद्धा भविष्यवेत्त्यांच्या पंक्तीत सामील झाली. सेंट पीटर्सबर्गच्या हेर्मिटेज संग्रहालयातील हे कर्णबधीर मांजर. तिच्या समोरील भांड्यातील खाद्य खाऊन ती कौल द्यायची. या विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात रशिया सौदी अरेबियाला नामोहरम करील, हे तिचं भाकित खरं ठरलं.

  • यंदाच्या विश्वचषकात मोरोक्को, ट्युनिशिया, सौदी अरेबिया आणि इजिप्त ही चार अरब राष्ट्रे पात्र ठरतील, हे भविष्य फराह या बहिरी ससाण्यानं व्यक्त केलं होतं. राष्ट्रध्वज असलेले लाकडी फलक निवडून ती भाकितं मांडते.

  • पॉलचा वारसदार म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या रुबिओ या ऑक्टोपसनं मागील विश्वचषकात आपल्याला निकालांनी धूमाकूळ घातला. गटसाखळीत त्यानं जपानबाबत अचूक अंदाज वर्तवले होते.

zabiyaka the goat

प्रसिद्धीच्या शिखरावरुन पायउतार

रशियाच्या सामारा प्राणी संग्रहालयातील झबियाका या बकरीलाही मोठी प्रसिद्धी मिळाली होती. तिच्यासमोर राष्ट्रध्वज चिकटवलेली तीन बॉक्सेस ठेवली जायची. यातील एक निर्णय बरोबरीचा असायचा. पण २०१८च्या विश्वचषकाबाबतचा तिचा अंदाज चुकला आणि तिच्या मोठेपणाला ओहोटी लागली. अंतिम सामन्याबाबत तिनं बेल्जियमला कौल दिला. पण प्रत्यक्षात फ्रान्सनं विश्वचषक जिंकला होता.

paul octopus

‘ज्योतिरसॉकर’ पॉल ऑक्टोपस

२०१०च्या विश्वचषक स्पर्धेबाबत पॉलचं भाकित खरं ठरलं आणि त्याला सगळ्यांनी डोक्यावर घेतलं. पॉलनं फुटबॉल सामन्यांबाबत १४ भाकितं वर्तवली. यापैकी १२ अचूक ठरली. पॉल मूळचा जर्मनीचा. २६ जानेवारी २००८ हा त्याचा जन्मदिन.

जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांची तो भविष्यवाणी करायचा. राष्ट्रांचे ध्वज असलेल्या दोनपैकी एका खाद्यपदार्थाच्या बॉक्सची निवड पॉल करत असे. तो ज्याची निवड करेल, तो संघ विजयी होत असे. २०१०च्या विश्वचषकात स्पेन नेदरलँड्सला हरवून विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवेल, हेसुद्धा पॉलनं आधीच नमूद केलं होतं.

युरो-२००८च्या सहा सामन्यांबाबत भाकितं व्यक्त करून पॉलनं सर्वांचं लक्ष वेधलं. पण अंतिम फेरीबाबतचं पॉलचं भविष्य खोटं ठरलं होतं आणि जर्मनीनं स्पेनला हरवून जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे जर्मनीवासीयांनी त्याला खलनायक ठरवलं.

पॉलला शिजवून खाण्याची धमकीसुद्धा अनेक फुटबॉलप्रेमींनी दिली. त्यामुळे स्पेनचे पंतप्रधान जोस झापाटेरो यांनी पॉलच्या संरक्षणासाठी सुरक्षा व्यवस्थासुद्धा देऊ केली होती. याचप्रमाणे पॉल आमच्या देशात सुरक्षित राहू शकेल, अशीसुद्धा मागणी स्पेनमधून होऊ लागली होती.

दुसरीकडे पॉलच्या भविष्यवाणीच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यात काही संशोधकही गुंतले होते. तो ध्वजाचे रंग, खाद्यापदार्थांचा गंध यांचा कशा प्रकारे विचार करतो आणि आपले मतप्रदर्शन करतो, याचा त्यांनी अभ्यास केला. एखादा जलचर प्राणी इतके यशस्वीपणे कसे काय भाष्य करू शकतो, हे गूढ मात्र त्यांना उकलता आले नाही.

२६ ऑक्टोबर २०१० या दिवशी पॉलचं निधन झालं. पण मृत्यूनंतरही पॉल चर्चेत राहिला.

यूटच लॅब्जनं ‘आस्क द ऑक्टोपस’ नामक आय-फोन अ‍ॅपची निर्मिती केली. २०१०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किल ऑक्टोपस पॉल’ या थरारक चायनीज चित्रपटात पॉलची भाकितं ही कशी आंतरराष्ट्रीय सामना निश्चितीचा भाग झाली, हे कथानक रेखाटण्यात आलं होतं. २०१४ची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा चालू असताना गुगल ‘डूडल’नंही पॉलला आकर्षक पद्धतीनं श्रद्धांजली वाहिली.

कृत्रिम बुद्धिमत्ता

आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेनंही २०२२च्या विश्वचषकाबाबत अंदाज व्यक्त केले आहेत. बीसीए रिसर्च या नावाजलेल्या गुंतवणुक कंपनीनं सुपर कॉम्प्युटरद्वारे केलेल्या एका प्रयोगाआधारे अर्जेंटिना यंदाचा विश्वचषक जिंकेल, असं वर्तवलं आहे.

दोहाच्या लुसेल स्टेडियमवर १८ डिसेंबरला लिओनेल मेसीचा अर्जेंटिना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल यांच्यात अंतिम सामना होईल, असं भाकित एआय अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने मांडले आहे.

मेसी आणि रोनाल्डा या फुटबॉमधील महानायकांच्या कारकीर्दीतील ही अखेरची विश्वचषक स्पर्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT