Crocodile Attack On Footballer : कोस्टा रिकाचा फुटबॉलपटूने स्वतःहून नदीत उडी घेतली अन् दबा धरून बसलेल्या मगरीनं त्याच्यावर क्षणात हल्ला चढवत फुटबॉलपटूला आपलं भक्ष्य बनवलं. मिळालेल्या वृत्तानुसार जिजस अल्बर्टो लोपेझ ओर्टिझवर कनास नदीत मगरीने हल्ला केला. ओर्टिझ हा चुचो या टोपण नावाने देखील ओळखला जात होता.
चुचो हा आपले मित्र आणि चुलत भावांबरोबर कनास नदीच्या पुलावर गेले होते. त्यावेळी चुचोच्या मित्रांनी आणि भावंडांनी त्याला नदीत उडी न मारण्याचा सल्ला दिला होता. मात्र चुचोने धुडकावून लावला. 29 वर्षाच्या चुचोने नदीत उडी मारल्यानंतर मगरीने त्याच्यावर हल्ला चढवला.
चुचो आपला जीव वाचण्यासाठी धडपडत होता मात्र मगरीने त्याला दूर ओढत नेले. गावकऱ्यांनी देखील या मगरीला मारण्या सुरूवात करत चुचोला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र मगरीने चुचोला सोडले नाही. त्यानंतर स्थानिकांनी चुचोचा मृतदेह मिळवण्यासाठी त्या मगरीवर गोळी चालवली. (Crocodile Attack News)
कोस्टा रिकामध्ये संरक्षित जनावरांना मारण्यावर बंदी आहे. यात मगरीचा देखील समावेश आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी गावकरण्यावर कारवाई करणार की नाही याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.
स्थानिक पोलिकांनी डेली मेलला दिलेल्या माहितीनुसार, 'मगरीला कोणतीही हानी न पोहचवता मृतदेह मिळवण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले होते. मात्र ते शक्य झाले नाही. त्यानंतरच मगरीला मारण्याचा निर्णय घेण्यात आला.'
चुचो हा डेपोर्टिव्हो रिओ कनासचा फुटबॉलपटू होता. त्याला तीन आणि आठ वर्षाची दोन मुले देखील आहेत. डेपोर्टिव्हो रिओ कनासने आपल्या वक्तव्यात फुटबॉलपटूचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ' दुःखद अंतःकरणाने चुचोचे निधन झाल्याचे आम्ही जाहीर करतो. त्याच्या आत्म्यास शांती मिळो. आम्ही सर्व कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.