Yuvraj Singh-Hazel Keech Announce Second Baby sakal
क्रीडा

Yuvraj Singh Daughter : युवराज सिंग दुसऱ्यांदा झाला बाबा, चाहत्यांसोबत आपल्या परीची पहिली झलक केली शेअर

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच दुसऱ्यांदा आईबाबा झाले आहेत. हेजलनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Yuvraj Singh-Hazel Keech Announce Second Baby : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh)  दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचने (Yuvraj Singh Hazel Keech Blessed Baby girl) मुलीला जन्म दिला आहे. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून युवराजने आपल्या चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आहे. 

युवराजने सोशल मीडियावर आपल्या लाडक्या लेकीसोबतचा फोटो शेअर केला आहे. चाहतेमंडळी व सेलिब्रिटींकडून या पोस्टवर शुभेच्छा व लाइक्सचा वर्षाव होत आहे. 

युवराज सिंगने आपल्या लाडक्या लेकीचे नाव देखील सांगितलं

युवराज सिंग आणि हेजल कीचने आपल्या लाडक्या लेकीचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘झोपेशिवाय असलेल्या या रात्री अधिक आनंदी वाटत आहेत. कारण आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आमची राजकन्या ऑराचे स्वागत केले आहे.’ युवराजने आपल्या परीला कुशीमध्ये घेतले आहे तर फोटोमध्ये दुसरीकडे हेजल कीच आपल्या मुलाचा सांभाळ करताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो अगदी परेफक्ट फॅमिली फोटो दिसतोय.

युवराज सिंग आणि हेजल कीचच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. चाहत्यांव्यतिरिक्त हरभजन सिंग, अभिनेत्री ऋचा चढ्ढा यासारख्या सेलिब्रिटींनीही या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Elections: बुलेटची पैज! नेता जिंकेल की नाही यावर कार्यकर्त्यांनी लावली पैज, ५०० रुपयांचा लिहून घेतला बॉण्ड

AUS vs PAK 2nd ODI : 28 वर्षानंतर पाकिस्तान जिंकला! विराटकडून धुलाई झालेला गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला

Latest Maharashtra News Updates : काॅंग्रेसने ओबीसी आणि दलितांना एकमेकांपासून दूर ठेवले, पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

TET Exam : परीक्षार्थींचे बायोमेट्रिक, फेस स्कॅन; टीईटी परीक्षेची जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून तयारी

मालिकांसाठी नाही तर 'या' साठी भारतात परतली मृणाल दुसानिस, पती नीरजने सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT