Neeraj Chopra Arshad Nadeem Olympic 2024 esakal
क्रीडा

Arshad Nadeem Gold : शेर के बच्चे ने...! नीरजला हरवणाऱ्या अर्शद नदीमचे Shoaib Akhtar कडून कौतुक, म्हणतो...

Paris Olympic 2024: पाकिस्तानचे ७ खेळाडूच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते आणि त्यापैकी अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले.

Swadesh Ghanekar

India at Paris Olympic 2024 Medal Table : पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ( Arshad Nadeem) ९२.९७ मीटर लांब भाला फेकला अन् गतविजेत्या भारताच्या नीरज चोप्राला ( Neeraj Chopra) रौप्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले. नीरजने ८९.४५ मीटरसह दुसरे, तर ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर ८८.५४ मीटरसह तिसरे स्थान पटकावले. अर्शदने पाकिस्तानला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिले.

नदीमने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर लांब भाला फेकला आणि सुवर्णपदक निश्चित केले. गतविजेत्या नीरजचे सहापैकी पाच प्रयत्न फसले आणि दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटर फेकलेल्या भाल्यामुळे त्याचे रौप्यपदक निश्चित झाले. पीटरने ८८.५४ मीटरसह कांस्यपदक नावावर केले.

शोएब अख्तरकडून कौतुक...

"खूप मोठी बातमी... अर्शद नदीम गोल्ड मेडल... कोणाच्याही ध्यानी मनी नसताना अर्शदने हा पराक्रम केला. शेर के बच्चे ने, पाकिस्तानला गोल्ड मेडल जिंकून दिले. तुझे खूप खूप अभिनंदन. पाकिस्तानचे अभिनंदन. एका गोल्ड मेडलने पाकिस्तानातील पूर्ण वातावरण बदलून टाकलं. संपूर्ण जगात आता त्याचीच चर्चा होतेय. पाकिस्तानचे ७ खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते आणि त्यापैकी अर्शदने सुवर्णपदक जिंकलं,''असे शोएब अख्तरने X अकाऊंटवर म्हटले.

एका सुवर्णपदकाने पाकिस्तान मोठी झेप

अर्शद नदीमने पाकिस्तानला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने भालाफेकीत पाकिस्तानचे पदकाचे खाते उघडले. ऑलिम्पिक २०२४ मध्ये पाकिस्तानचे सात खेळाडूच सहभागी झाले होते आणि त्यात पदक जिंकणारा अर्शद हा एकमेव खेळाडू ठरला. पण, त्याच्या या पदकाने पाकिस्तानला पदक तालिकेत ५३व्या क्रमांकावर पोहोचवले. भारत १ रौप्य व ४ कांस्यपदकासह ६४ व्या क्रमांकावर आहे. काल भारताने हॉकीत कांस्यपदक जिंकले होते. अमेरिका १०३ पदकांसह अव्वल स्थानी आहे, त्यानंतर चीन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स व ग्रेट ब्रिटन हे अव्वल पाच देशांमध्ये आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT