भारतीय संघाचे माजी फिरकीपटू रमेश पोवार यांच्याकडे पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट टीमची जबाबदारी देण्यात आलीये. क्रिकेट सल्लागार समितीची शिफारस मान्य करत बीसीसीआयने त्यांना पुन्हा कोच म्हणून नियुक्त केले आहे. अडीच वर्षांपूर्वी अनुभवी क्रिकेटर आणि कर्णधार मिताली राज हिच्यासोबतच्या वादानंतर त्यांची कोच पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर माजी क्रिकेटर डब्लू व्ही रमन यांच्याकडे प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
रमन यांचा कार्यकाळ डिसेंबरमध्येच संपुष्टात आला होता. त्यांनी पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज केला होता. मदन लाल आणि सुलक्षणा नाइक यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने पोवार यांच्याकडे संघाच्या मार्गदर्शनाची जबाबादारी द्यावी, अशी शिफारस बीसीसीआयला केली होती. बीसीसीआयने 16 एप्रिल रोजी प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. 35 जणांनी या पदासाठी अर्ज केला होता. अखेरच्या टप्प्यात 4 पुरुष आणि 4 महिला क्रिकेटरचे अर्ज विचाराधीन होते. यात हेमलता काला आणि जया शर्मा या महिला क्रिकेटर्सच्या नावाचा समावेश होता.
अखेर बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीच्या शिफारीशीला मान्यता देत अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा रमेश पोवार यांच्यावर विश्वास दाखवला. बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.
मिताली-पोवार वाद
भारतीय संघाची अनुभवी आणि स्टार क्रिकेटर मिताली राज हिने रमेश पोवार यांच्यावर अपमानजन्य व्यवहार केल्याचा आरोप केला होता. 2018 च्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाने सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती. सेमीफायनलमध्ये रमेश पोवार यांनी अनुभवी मिताली राजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नव्हते. मिताली राजने बीसीसीआयला पत्र लिहून अपमानजनक वागणून मिळाली, अशी तक्रार केली होती. बीसीसीआयसमोर आपली बाजू मांडताना पोवार यांनी टी-20 प्लॅनमध्ये मिताली फिट होत नसल्याचे स्पष्टिकरण दिले होते. या प्रकरणानंतर बीसीसीआयने रमेश पोवार यांनी हटवून त्यांच्या जागेवर रमन यांची नियुक्त केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.