WI vs IND 1983 World Cup esakal
क्रीडा

1983 World Cup : भारत नशीबानं जिंकला; संघात प्रभावी खेळाडूच नव्हते... विंडीजच्या माजी खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

WI vs IND 1983 World Cup : वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्ट्स यांनी 1983 मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या मते भारत 1983 सालच्या वर्ल्डकपमध्ये नशीबवान ठरला.

वेस्ट इंडीजने 1975 आणि 1979 ला सलग दोन वर्ल्डकप जिंकले होते. मात्र 1983 च्या वर्ल्डकपमध्ये त्यांना हॅट्ट्रिक साधता आली नाही. भारताने फायनलमध्ये त्यांना पराभूत करत वर्ल्डकप जिंकला. मात्र अँडी रॉबर्ट्स यांच्या मते त्या वर्ल्डकप विजेत्या संघातील एकही खेळाडू हा प्रभावशाली नव्हता.

स्पोर्ट्सस्टारशी बोलताना रॉबर्ड्स म्हणाले की, 'आम्ही चांगल्या फॉर्ममध्ये होतो मात्र एक सामना खराब गेला. 1983 ला भारताला नशीबाने साथ दिली. कारण त्या स्पर्धेतील ग्रेट संघ हा आमचाच होता. आम्ही 1983 च्या वर्ल्डकपमध्ये फक्त दोन सामने हरलो. दोन्हीवेळा भारताने हरवले.

मात्र त्यानंतर पाच - सहा महिन्यांनी आम्ही भारताला 6 - 0 ने पराभूत केले. म्हणजेच आम्हाला फक्त तो अंतिम सामना महागात पडला. ते 180 च्या आसपास धावांवर बाद झाल्यानंतर नशीबाने भारताच्या बाजूने कौल दिला. भारातने आम्हाला हरवले नाही तर आम्ही फक्त सामना हरलो. हा काही अती आत्मविश्वास किंवा आत्मसंतुष्टता नाहीये.'

रॉबर्ट्स पुढे म्हणाले की, 'भारताच्या संघातील कोणत्याही फलंदाजाने मला प्रभावित केले नाही. कोणीही अर्धशतक ठोकले नाही. कोणत्याही गोलंदाजाने 5 किंवा 4 विकेट्स घेतल्या नाहीत. मला कोणीच प्रभावित केले नाही. एखादा फलंदाज ज्यावेळी टॉप क्लास इनिंग खेळतो त्यावेळी तो प्रभावित करतो. भारताकडून असं कोणी नव्हतं.'

सामना कुठं फिरला याबाबत रॉबर्ट्स म्हणाले की, रिचर्ड्स बाद झाला अन् सामना फिरलला. रॉबर्ट्स यांनी सांगितले की, 'मला असे वाटते ज्यावेळई रिचर्ट्स बाद झाल्यानंतर सामना फिरला. यातून आम्ही सावरलोच नाही. 1975, 1976 आणि 1983 च्या फायलनमध्ये एकच फरक होता. पहिल्या दोन्ही वर्ल्डकपमध्ये आम्ही प्रथम फलंदाजी केली. 83 च्या वर्ल्डकपमध्ये आम्ही दुसऱ्यांदा फलंदाजी केली. हाच मोठा फरक होता.'

अंतिम सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करण्याचा पाचारण केल्यानंतर 183 धावा केल्या होत्या. यावेळी के. श्रीकांत यांनी सर्वाधिक 57 चेंडूत 38 धावांची खेळी केली होती. तर संदीप पाटील आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी 27 आणि 26 धावांचे योगदान दिले.

याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या वेस्ट इंडीजला 43 धावा कमी पडल्या. अमरनाथ आणि मदन लाल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे विंडीजची फलंदाजी ढेपाळली. नुकतेच भारताची 83 च्या वर्ल्डकप जिंकणारा संघ विजयाचे 40 वे वर्ष साजरे करण्यासाठी एकत्र जमला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT