French Open 2022: भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने फ्रेंच ओपन टेनिसमध्ये इतिहास रचला आहे. बोपण्णाने नेदरलँडमधील त्याचा जोडीदार मॅटवे मिडेलकूप याच्यासोबत मिळून हे कामगिरी केले. पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत बोपण्णा आणि मिडेलकूप ब्रिटनच्या लॉयड ग्लासपूल आणि फिनलंडच्या हॅरी हेलीओव्हारा यांचा 4-6, 6-4, 7-6 असा पराभव केला.
बोपण्णा आणि मिडेलकोप यांचा उपांत्य फेरीत सामना 12व्या मानांकित मार्सेलो अरेव्हालो आणि जीन-जूलियन रॉजर यांच्याशी होईल. रोहन बोपण्णाने ७ वर्षांनंतर ग्रँड स्लॅमची उपांत्य फेरी गाठली आहे.
रोहन बोपण्णा 2015 मध्ये विम्बल्डनमध्ये शेवटचा ग्रँडस्लॅम सेमीफायनल सामना खेळला होता. मात्र त्याचा उपांत्य फेरीतच प्रवास संपुष्टात आला होता. भारताचा रोहन बोपण्णा प्रथमच फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याचवेळी ग्रँडस्लॅममधील त्याच्या साथीदार मिडेलकोपची पण ही पहिली उपांत्य फेरी आहे.
बोपण्णा आणि मिडेलकोप जोडीला पहिल्या गेममध्ये लॉइड ग्लासपूल आणि हॅरी हेलिओव्हाराकडून 6-4 असा पराभव केला. यानंतर बोपण्णा आणि मिडेलकोप जोडीने पुनरागमन करत गेम 6-4, 7-6 अशा फरकाने जिंकले. तिसर्या गेममध्ये ग्लासपूल आणि हेलिओव्हारा शानदार खेळ दाखवत 3-5 अशी आघाडी घेतली. मात्र दोन्ही खेळाडूंनी समजूतदारपणा दाखवत प्रतिस्पर्धी जोडीला वरचढ होऊ दिले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.