gautam gambhir meets rajya sabha mp harbhajan singh picture twitter sports cricket kgm00 
क्रीडा

भज्जी आणि गंभीर यांचं भेटीचं राजकारण,"AAP से तो पुरानी दोस्ती है"

भारतीय संघाचा माजी सलामीवीर बीजेपीचे खासदार गौतम गंभीर आणि माजी फिरकीपटू आपचे खासदार हरभजन सिंग यांची नुकतीच भेट झाली

Kiran Mahanavar

Gautam Gambhir Meets Harbhajan Singh: भारतीय संघाचा माजी सलामीवीर बीजेपीचे खासदार गौतम गंभीर आणि माजी फिरकीपटू आपचे खासदार हरभजन सिंग यांची नुकतीच भेट झाली. गौतम गंभीरने या भेटीनंतर हरभजन सिंग सोबत फोटो शेअर करत टोमणे मारणारे ट्विट केले. हरभजन अर्थात आम आदमी पार्टीचा सदस्य असल्याने गंभीरने त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. गौतम गंभीरचे हे ट्विट प्रचंड व्हायलर होत आहे.

गौतम गंभीर हे भाजपचे खासदार आहेत, तर आम आदमी पार्टीने राज्यसभेचे खासदार म्हणून हरभजन सिंग यांना पाठवले आहे. भज्जी आणि गौती हे दोघे भारतीय संघासाठी एकत्र खेळलेले आहे. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून ते आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्याचा फोटो ट्विट करताना गंभीरने लिहिले की, "आपसे तो पुरानी दोस्ती है और रहेगी".

गंभीर अनेकदा आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत असतो. हरभजन आणि गौतमच्या मैत्रीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही, म्हणूनच त्याने फोटोसोबत हे मजेदार कॅप्शन लिहिले आहे. हरभजन सिंगनेही हा फोटो रिट्विट करत लिहिले की, लीजंड गौतम गंभीर, तुला भेटून खूप आनंद झाला.

त्याचवेळी गंभीरच्या या ट्विटवर चाहत्यांनीही मस्ती करत आहे. एका युजरने लिहिले की, परंतु हे तुमची मित्र चुकीच्या मार्गावर गेले आहेत. गौतम गंभीर नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्ससोबत होता. गंभीरने येथे मार्गदर्शक म्हणून काम करत त्याच्यांमुळे लखनौचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या पहिल्याच हंगामात धमाकेदार कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT