Gautam Gambhir Reacts After Virat Kohli Naveen Ul Haq Share Warm Hug : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्डकप 2023 च्या नवव्या सामन्यात एक अतिशय मनोरंजक अशी घटना पाहायला मिळाली. या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा 8 गडी राखून पराभव करत टीम इंडियाने स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदवला.
या सामन्यात विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली दुरावा संपुष्टात आला. कोहली आणि नवीन यांनी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये एकमेकांना मिठी मारली, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे दृश्य पाहून क्रिकेट चाहते वेडे झाले. त्याचवेळी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने यावर मोठे वक्तव्य केले.
आयपीएल 2023 मध्ये कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि नवीन लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चा भाग होता आणि गौतम गंभीर हा LSG चा मेंटर होता. आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्यात कोहली आणि नवीन यांच्यात बाचाबाची झाली होती. सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करताना वातावरण पुन्हा एकदा तापले. यादरम्यान एलएसजीचा मेंटर गौतम गंभीरही या वादात उतरला होता, त्यानंतर हा वाद चांगलाच वाढला.
या घटनेनंतर अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीनला अनेकवेळा चाहत्याने कोहली-कोहलीचा नारा देत चिडवायचे. मात्र, बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी नवीनला ट्रोल करण्यास सुरुवात केल्यावर कोहलीने चाहत्यांना तसे करण्यापासून रोखले. सामन्यात भारताची पहिली विकेट 156 च्या एकूण धावसंख्येवर पडली. यानंतर कोहली फलंदाजीला आला आणि अफगाणचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नवीनला गोलंदाजी दिली. कोहलीने सिंगल काढला आणि त्यानंतर दोघांनीही हसून एकमेकांच्या पाठीवर थाप मारली आणि अंगठा दाखवला. आणि भांडण काही क्षणातच संपले. यादरम्यान गौतम गंभीरनेही आपले मत व्यक्त केले आहे.
कोहली आणि नवीन यांच्यात मैत्री झाल्यानंतर समालोचन करत असलेला गंभीर म्हणाला की, ‘हे बघा, तुम्ही मैदानात लढाई करता, मैदानाबाहेर नाही. प्रत्येक खेळाडूला त्याच्या संघासाठी, सन्मानासाठी आणि विजयासाठी लढण्याचा अधिकार आहे. तुम्ही कोणत्या देशाचे आहात आणि तुम्ही कोणत्या स्तराचे खेळाडू आहात हे महत्त्वाचे नाही. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या संघासाठी लढा, तुमच्या सन्मानासाठी लढा आणि मग विजयासाठी. मग तो कोणताही खेळाडू असो. पण चांगली गोष्ट म्हणजे कोहली आणि नवीन यांच्यातील लढत आता संपली आहे. पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कोणत्याही खेळाडूला ट्रोल करणे किंवा सोशल मीडियावर विचित्र बोलणे योग्य नाही. नवीन प्रथमच आयपीएलमध्ये खेळला हे तुमच्यासाठी समजून घेणे महत्त्वाचे आहे. तो अफगाणिस्तानसारख्या देशातून आला आहे, ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.